छ. संभाजीनगर - २१ कि.मी.चा रस्ता २५ कोटी रुपयांच्या केंद्रीय मार्ग निधीतून मंजूर
छत्रपती संभाजीनगर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। फुलंब्री मतदार संघातील देवगिरी साखर कारखाना, पिंपळगाव वळण, आडगाव, वाहेगाव, निधोना, गौर पिंपरी पर्यंत एकूण २१ कि.मी.चा रस्ता २५ कोटी रुपयांच्या केंद्रीय मार्ग (CRF) निधीतून मंजूर झाला आहे. भाजप आमदार अनुराधा
२१ कि.मी.चा रस्ता २५ कोटी रुपयांच्या केंद्रीय मार्ग (CRF) निधीतून मंजूर


छत्रपती संभाजीनगर, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। फुलंब्री मतदार संघातील देवगिरी साखर कारखाना, पिंपळगाव वळण, आडगाव, वाहेगाव, निधोना, गौर पिंपरी पर्यंत एकूण २१ कि.मी.चा रस्ता २५ कोटी रुपयांच्या केंद्रीय मार्ग (CRF) निधीतून मंजूर झाला आहे. भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांनी ही माहिती दिली.

हा रस्ता फुलंब्री-कन्नड दोन तालुक्यांना जोडणारा असून संपूर्ण भागाच्या भवितव्याला दिशा देणारी विकासरेषा ठरणार आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना आणि शेतकरी बांधवांना होणारे फायदे -

- शेतीमाल वाहतूक सुलभ - ऊस, कापूस, सोयाबीन, भाजीपाला यासारख्या शेतीमालाचा वेगवान आणि सुरक्षित पुरवठा होईल. वाहतूक खर्चात मोठी बचत आणि बाजारपेठेत वेळेवर पोहोचण्याचा फायदा मिळेल.

- देवगिरी साखर कारखाना परिसरातील वाहतूक अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार.

- आडगाव, वाहेगाव, निधोना आणि गौर पिंपरीसारख्या गावांना सुरक्षित आणि दर्जेदार संपर्क मिळेल.

- औद्योगिक विकास आणि रोजगाराला चालना - उत्तम रस्त्यामुळे छोट्या उद्योगांना, व्यापाराला आणि स्थानिक व्यवसायांना नवी उर्जा मिळेल. गुंतवणूकदारांसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरेल.

- धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, आरोग्यसेवा यांच्याशी जोडणी वेगवान होऊन सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन अधिक सोयीस्कर होईल.असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

---

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande