
दयानंदमुळे जवळ येणार तारिणी आणि केदार?
मुंबई, 3 नोव्हेंबर (हिं.स.)। तारिणी मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. तारिणी निशीच्या सोबत युवराजचं खरं रूप समोर आणण्यासाठी घरात प्रवेश करणार आहे. त्याचवेळी युवराजवर एका ड्रग डीलमधील नुकसानाची रक्कम न भरल्याचा आरोप आहे. या रहस्यामागे नक्की कोण आहे, हे शोधण्याचा निर्धार तारिणी करते. दुसरीकडे, निशी खांडेकरणाच्या घरातील वातावरणात अडकते. पद्मिनी नोकरांना जेवायला सांगते पण जेवण बिघडल्याने घरात गोंधळ होतो. तारिणी ते सावरते. पण कौशिकीच्या मनात संशयाचं बीज पेरलं जातं. दरम्यान, केदार तारिणीला मिस करतोय.
दयानंदला तारिणी आणि केदारची वाढती जवळीक दिसते. तो त्यांच्या नात्याला बळ देण्यासाठी तारिणीकडून केदारच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला घरी बोलवण्यासाठी कारण शोधतो. दरम्यान, पद्मिनी, चेतना आणि ईशा सतत निशीसमोर अडथळे आणतात, पण तारिणी आपल्या हुशारीने ते दूर करते. इरा सोबत झालेल्या तिच्या मैत्रीने कौशिकीला आनंद होतो, पण शेखरप्रती तारिणीची नम्र वागणूक पाहून ती पुन्हा नाराज होते.
तारिणी आणि युवराज यांच्यातील वाद आता अधिक रंगणार आहे. युवराज तिची खिल्ली उडवतो, पण तारिणी ठामपणे सांगते की ती त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आणणारच. निशीला मात्र त्यांच्या नात्याबद्दल गैरसमज होतो आणि युवराज या गैरसमजाला खतपाणी घालतो. तारिणी युवराजच्या खोलीत शोध घेण्यासाठी जाते आणि तिथे तिची भेट गुलाबशी होते. पण जेव्हा सगळे खोलीत जातात, तेव्हा तिथे कुणीच नसतं. आता पण तारिणीच्या मनात शंका निर्माण झालेय तो माणूस नक्की कोण होता आणि अचानक कुठे गेला? तारिणी कसं सोडवेल हे कोडं. यासाठी बघायला विसरू नका 'तारिणी' सोम- शुक्र रात्री ९:३० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule