
सोलापूर, 4 नोव्हेंबर, (हिं.स.) - शहरातील उपळाई रोड, शेंडगे प्लॉट येथे फार्मसिस्टची नोकरी करणाऱ्या महिलेचा भरदिवसा राहत्या घरी ओढणीने गळा आवळून, चाकूने चेहऱ्यावर वार करून खून केला. संशयित आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. नीलम बालाजी निरफळ (वय ३८, रा. उपळाई रोड, शेंडगेप्लॉट, बार्शी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
नीलम यांनी दुपारी तीनच्या दरम्यान पतीला फोन करून सांगितले होते की, आज घरी तुळशीचा विवाह करायचा आहे तुम्ही लवकर या, येताना विवाहाचे साहित्य घेऊन या. त्यानुसार पती बालाजी हे घरी आले. तेव्हा मुख्य गेटला कुलुप दिसले.शेजारी, आसपास पत्नी गेली असेल म्हणून वाट पाहिली. शाळेत मुलगा आणण्यास गेली असावी म्हणून शाळेत पाहिले, पण पत्नी दिसून आली नाही. अखेर गेटवरून एका मुलास घरात सोडून खिडकीतून पाहण्यास सांगितले. त्यावेळी ती झोपल्याचे दिसले. मोबाइल घरातच वाजत होता. त्यामुळे संशय आला, अशी माहिती बालाजी निरफळ यांनी पोलिसांना सांगितली.पोलिस उपअधीक्षक अशोक सायकर, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून मृतदेह तपासणी प्रक्रियेसाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड