
नाशिक, 4 नोव्हेंबर, (हिं.स.)। राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ६४ व्या महाराष्ट्रव्यापी हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धांचे नाशिक केंद्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ५ नोव्हेंबरपासून सायंकाळी ७ वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सादरीकरण होणार आहे.नाशिक केंद्रात तब्बल २६ नाटकांची मेजवानी नाशिककरांना लाभणार आहे. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ५ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता स्पर्धेचा उद्घाटन समारंभहोणार आहे. त्यानंतर सायंकाळी सात वाजता प्रयोग सादर होणार आहे. यंदाच्या वर्षी नाशिक केंद्रात २६ नाटकांचे सादरीकरण होणार आहे. दि. ५ ते ३० नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती स्पर्धाप्रमुख राजेश जाधव यांनी दिली.
दि. ५ नोव्हेंबर- कालचक्र, ६ नोव्हेंबर कज्जा, ७ नोव्हेंबर गंमत असते नात्याची, ८ नोव्हेंबर द कॅटालिस्ट, ९ नोव्हेंबर अथांग, १० नोव्हेंबर Bd-heod नेबर, प्लंबर आणि ती, ११ नोव्हेंबर कुरुक्षेत्र, १२ नोव्हेंबर मर्कट, १३ नोव्हेंबर प्रतिषिद्ध, १४ मराठी नाट्य नोव्हेंबर- एक रिकामी बाजू, १५ नोव्हेंबर वो फिर नहीं आते, १६ नोव्हेंबर दो लब्जोंकी कहानी, १७ नोव्हेंबर प्यार कर ले घडी दो घडी, १८ नोव्हेंबर मन वढाय वढाय, १९ नोव्हेंबर- शिनेमा, २० नोव्हेंबर कुच कुच, २१ नोव्हेंबर-E=MC २ ते ओमकार, २२ नोव्हेंबर सुपारी डॉट कॉम, २३ नोव्हेंबर मालकीण मालकीण दार उघड, २४ नोव्हेंबर काळोख देत हुंकार, २५ नोव्हेंबर- एक्सपायरी डेट, २६ नोव्हेंबर मिशन २९, २७ नोव्हेंबर- काठ काळाच्या पंजातून, २८ नोव्हेंबर तुका तड नामा, २९ नोव्हेंबर इथेच टाका तंबू, ३० नोव्हेंबर चार भिंतीचे घर.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV