आशिया कप ट्रॉफी वाद : मोहसीन नक्वीच्या भूमिकेवर बीसीसीआयचा आक्षेप; प्रकरण आयसीसीकडे
नवी दिल्ली , 7 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि एशियन क्रिकेट काउंसिल (एसीसी) चे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी अद्याप भारताला एशिया कप-2025 ची ट्रॉफी दिलेली नाही. या कारणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे आणि आता भारतीय क्रिकेट बो
आशिया कप ट्रॉफी वाद:


नवी दिल्ली , 7 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि एशियन क्रिकेट काउंसिल (एसीसी) चे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी अद्याप भारताला एशिया कप-2025 ची ट्रॉफी दिलेली नाही. या कारणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे आणि आता भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) ने नकवीला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. बीसीसीआयने मोहसिन नकवी यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे.

बीसीसीआयने आईसीसीच्या बैठकीत सादर करण्यासाठी नकवीविरुद्ध संपूर्ण यादी तयार केली आहे. या यादीत नकवीवर अनेक आरोप आहेत, ज्यामध्ये आईसीसीच्या नियमांचे उल्लंघनही समाविष्ट आहे. तथापि, अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही सांगितले जात आहे की नकवी घरगुती राजकीय कारणांमुळे या बैठकीला हजर राहणार नाहीत.

रिपोर्टनुसार, बीसीसीआयने नकवीविरुद्ध आरोपांची यादी तयार केली आणि त्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे. बीसीसीआयचे म्हणणे आहे की,पाकिस्तानचे गृह मंत्री असूनही ते खेळ अधिकाऱ्याचे पद धारण करू शकत नाहीत. बीसीसीआय हा मुद्दा येत्या शुक्रवारी होणाऱ्याआईसीसीच्या बैठकीत मांडणार आहे आणि यासाठी त्यांना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा मिळत आहे. अलीकडेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधही तणावपूर्ण झाले आहेत. पाकिस्तानने अलीकडेच अफगाणिस्तानवर हल्ला केला होता ज्यात तीन अफगाणीक्रिकेटपटूंचा मृत्यू झाला होता.रिपोर्टनुसार, अफगाणिस्तान भारताच्या बाजूने उभे राहील आणि नकवीला काही पद सोडण्यास सांगेल. तरीसुद्धा, नकवी मागे हटणाऱ्यांपैकी नाहीत.

स्रोतांच्या माहितीनुसार, ट्रॉफी हस्तांतरणाबाबतची स्थिती अजूनही अस्पष्ट आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी अलीकडे सांगितले की या मुद्द्यावर आधीच एसीसी ला एक औपचारिक पत्र पाठवले गेले आहे, पण अजून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.सैकिया यांनी संकेत दिले की या विलंबाबद्दल बीसीसीआय अत्यंत गंभीर आहे आणि याला त्यांनी खेळभावना आणि संस्थात्मक पारदर्शकतेच्या विरुद्धचे पाऊल मानले आहे.

याच वर्षी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानपासून अंतर राखले आहे. एशिया कपमध्येही टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हातमिळवणी टाळली होती. टीम इंडियाने हा निर्णय घेतला होता की त्यांनी कोणत्याही पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही. या कारणामुळे भारताने एशिया कप जिंकल्यानंतर नकवीकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला होता, जे एसीसी चे अध्यक्ष म्हणून विजेत्याला ट्रॉफी देऊ इच्छित होते. भारताने नकार दिल्यानंतर नकवी ट्रॉफी घेऊन निघून गेले आणि अद्यापही भारताला ती ट्रॉफी मिळाली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande