हॉंगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धा : भारताने पाकिस्तानला दोन धावांनी हरवले
हॉंगकाँग, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। आजपासून हॉंगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेला सुरुवात झाली असून, भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर 2 धावांनी विजय मिळवला आहे. हा सामना हॉंगकाँगच्या मॉन्ग कॉक मैदानावर खेळला गेला. भारताने प्रथम फलंदाजी करताना नि
हॉंगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धा


हॉंगकाँग, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। आजपासून हॉंगकाँग सिक्सेस 2025 स्पर्धेला सुरुवात झाली असून, भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर 2 धावांनी विजय मिळवला आहे. हा सामना हॉंगकाँगच्या मॉन्ग कॉक मैदानावर खेळला गेला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकांत 86 धावा केल्या होत्या. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात पाकिस्तानला केवळ 3 षटकेच खेळता आली आणि त्यांनी 41 धावा केल्या. डकवर्थ-लुईस (डीएलएस) पद्धतीनुसार भारताला 2 धावांनी विजयी घोषित करण्यात आले.

भारतीय संघाकडून रॉबिन उथप्पा आणि भरत चिपली यांनी जोरदार सुरुवात केली. पहिल्या दोन षटकांतच त्यांनी 34 धावा फटकावल्या. तिसऱ्या षटकात उथप्पा 11 चेंडूत 28 धावा करून बाद झाले. त्यानंतर आलेल्या स्टुअर्ट बिन्नी यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार मारला, मात्र पुढच्या चेंडूवर तेही बाद झाले. दिनेश कार्तिक यांनी 6 चेंडूत 17 धावांचे योगदान दिले. अशा प्रकारे भारतीय डाव 86/4 वर संपला.

87 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानने पहिल्याच षटकात 18 धावा काढल्या. दुसऱ्या षटकात स्टुअर्ट बिन्नीने फक्त 7 धावा दिल्या, पण तिसऱ्या षटकात शाहबाज नदिमने 16 धावा खर्च केल्या. अशा रीतीने पाकिस्तानने 3 षटकांत 1 गडी गमावून 41 धावा केल्या होत्या, तेवढ्यात पावसाने खेळ थांबवला. त्यानंतर डीएलएस पद्धतीनुसार भारतीय संघाला 2 धावांनी विजयी घोषित करण्यात आले. हा सामना भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना होता.

या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी झाले आहेत, ज्यांना प्रत्येकी तीन संघांच्या चार गटांमध्ये विभागले गेले आहे. भारत, पाकिस्तान आणि कुवैत हे ग्रुप सी मध्ये आहेत. पाकिस्तानने दोन सामन्यांत एक विजय मिळवून पहिले स्थान, तर भारताने एका विजयासह दुसरे स्थान मिळवले आहे. प्रत्येक गटातील पहिल्या दोन संघांना उपांत्यपूर्व फेरीत (क्वार्टरफायनल) प्रवेश मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande