तृणमूल खासदार कल्याण बनर्जी यांची सायबर फसवणूक
स्टंट बँकेच्या खात्यातून लंपास केले सुमारे 56 लाख रुपये कोलकाता, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : सायबर गुन्हेगारांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांची लाखो रूपयांनी फसवणूक केली आहे. बॅनर्जी यांच्या स्टेट बँकेतील निष्क्रीय खात्यातून सुमारे 56
कल्याण बॅनर्जी, खासदार तृणमूल काँग्रेस


स्टंट बँकेच्या खात्यातून लंपास केले सुमारे 56 लाख रुपये

कोलकाता, 07 नोव्हेंबर (हिं.स.) : सायबर गुन्हेगारांनी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांची लाखो रूपयांनी फसवणूक केली आहे. बॅनर्जी यांच्या स्टेट बँकेतील निष्क्रीय खात्यातून सुमारे 56 लाख रुपये वळते करण्यात आले आहेत. याप्रकरणी स्टेट बँकेने (एसबीआय) कोलकात्याच्या सायबर गुन्हे पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

स्टेट बँकेच्या तक्रारीनुसार, जालसाजांनी बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार केले, ज्यावर कल्याण बनर्जी यांचा फोटो लावला होता. या बनावट कागदपत्रांचा वापर करून गुन्हेगारांनी त्यांच्या जुने खात्याचे केवायसी अपडेट केले. यानंतर 28 ऑक्टोबर रोजी खात्यात नोंदलेला मोबाइल नंबर देखील बदलला गेला, ज्यामुळे त्यांना खात्यावर पूर्ण नियंत्रण मिळाले. तक्रारीनुसार, खात्याच्या माहिती मिळाल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी अनेक ऑनलाइन व्यवहार केले आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून सुमारे 56 लाख 39 हजार 767 रुपये काढले. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, काढलेली रक्कम अनेक वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर केली गेली, एटीएममधून काढली गेली आणि तसेच दागिने खरेदी करण्यासाठी देखील वापरली गेली.

कोलकाता पोलिसांच्या साइबर क्राइम विभागाचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले, पूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी केली जात आहे. आम्ही बँकेच्या आंतरिक प्रक्रियेची तपासणी करत आहोत आणि खात्यापर्यंत कसे पोहोचले याचा शोध घेत आहोत. जालसाज आणि रक्कमेच्या अंतिम गंतव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. बनावट केवायसी प्रक्रियेदरम्यान गुन्हेगारांनी कल्याण बनर्जी यांचा फोटो वापरला. पण मोबाइल नंबर दुसऱ्या व्यक्तीचा होता. रिपोर्टनुसार, हे खाते अनेक वर्षांपासून निष्क्रिय होते. हे खाते त्यावेळी उघडले गेले होते, जेव्हा कल्याण बनर्जी 2001 ते 2006 दरम्यान आसनसोल (दक्षिण) विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते आणि त्यावेळी त्यांना मिळणारे वेतन या खात्यात जमा व्हायचे. त्या काळापासून हे खाते बंद पडले होते, परंतु आता बनावट कागदपत्रांच्या मदतीने त्याचे पुन्हा सक्रिय करून फसवणूक करण्यात आली आहे.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande