दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉनचे 7 डिसेंबरला आयोजन
* यंदा “ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स थीमसह धावणार खेळाडू मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.) : ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स या प्रेरणादायक थीम अंतर्गत दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन सिझन ४ चे आयोजन रविवार, ७ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल
दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन


दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन


दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन


* यंदा “ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स थीमसह धावणार खेळाडू

मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.) : ब्रेकिंग बॅरियर्स, बिल्डिंग चॅम्पियन्स या प्रेरणादायक थीम अंतर्गत दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन सिझन ४ चे आयोजन रविवार, ७ डिसेंबर रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा ठाण्यात टीप टॉप प्लाझा येथे आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली. प्लेफ्री स्पोर्ट्स इंडिया तर्फे आयोजित ही मॅरेथॉन स्पर्धा बहुप्रतिक्षित फिटनेस स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या मॅरेथॉन मध्ये ५ हजार पेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या मॅरेथॉन मध्ये दोस्ती रियल्टी शीर्षक प्रायोजक म्हणून सामील झाली असून टीप टॉप प्लाझा आणि बजाज जनरल इन्शुरन्स सह-प्रायोजक आहेत.

धावपटूंची सुरक्षितता आणि काळजी यावर अधिक भर देत, बजाज जनरल इन्शुरन्सतर्फे प्रत्येक नोंदणीकृत सहभागीला ४ लाख किमतीच्या वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीचे कवच पुरवले जाईल, ज्यामुळे सर्वांसाठी एक सुरक्षित मॅरेथॉन म्हणून गणली जाणार आहे.

याबाबत प्लेफ्री स्पोर्ट्स इंडियाचे सीईओ, सितांशु झा म्हणाले की,“दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन ही केवळ एक शर्यत नाही हा फिटनेस, लवचिकता आणि एकत्र येण्याचा शहरव्यापी उत्सव आहे. दरवर्षी आम्ही लोकांना त्यांच्या मर्यादा ओलांडून धावण्याच्या भावनांना जीवनशैली म्हणून स्वीकारताना पाहतो. दोस्ती रियल्टी आमच्या शीर्षक प्रायोजक म्हणून आणि बजाज जनरल इन्शुरन्स प्रत्येक सहभागीची सुरक्षितता सुनिश्चित करत असल्याने, ही आवृत्ती खऱ्या अर्थाने एक समग्र धावण्याचा अनुभव दर्शवते — प्रेरणादायक, सुरक्षित आणि समुदाय-केंद्रित.”

दोस्ती रियल्टीचे संचालक, श्री. अनुज गोराडिया यांनी जोडले: “दोस्ती ठाणे हाफ मॅरेथॉन समुदायांना अधिक मजबूत, निरोगी बनवण्याच्या आमच्या विश्वासाला उत्तम प्रकारे प्रतिबिंबित करते. ज्याप्रमाणे आम्ही फिटनेसला प्रोत्साहन देणाऱ्या आणि कल्याण व संबंधांना चालना देणाऱ्या विविध सुविधांसह घरे तयार करतो, त्याचप्रमाणे ही मॅरेथॉन शहरवासीयांना फिटनेस, एकता आणि सामायिक यश मिळवण्यासाठी एकत्र आणते.”

ही मॅरेथॉन ठाण्यातील बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काउंटी येथून सकाळी ५:३० वाजता सुरू होईल आणि शहरातील नयनरम्य मार्गावरून धावेल. मॅरेथॉन एक्स्पो ५ आणि ६ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आयोजित केला जाईल. यात प्रमुख फिटनेस, आरोग्य आणि जीवनशैली ब्रँड्स तसेच सर्व सहभागींसाठी रेस बिब संकलन केले जाईल.

२०२५ च्या आवृत्तीत चार शर्यतींच्या श्रेणी आहेत . २१ किमी, १० किमी, ५ किमी, आणि १ माईल अशा आहेत. प्रत्येक सहभागीला प्रीमियम ड्राय-फिट टी-शर्ट, एक विशेष फिनिशर मेडल, १००० पेक्षा जास्त किमतीचे व्हाउचर उपलब्ध करून दिले जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande