इंडोनेशियन शाळेच्या परिसरातील मशिदीत स्फोट; ५४ जण जखमी
जकार्ता, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी (दि.७) नमाजदरम्यान एका हायस्कूलच्या परिसरात असलेल्या मस्जिदीत स्फोट झाला आहे. या स्फोटांमध्ये किमान ५४ जण जखमी झाले आहेत, ज्यांपैकी बहुतांश विद्यार्थी आहेत.एका वरिष्ठ पोलिस अ
इंडोनेशियन शाळेच्या परिसरातील मशिदीत स्फोट; ५४ जण जखमी


जकार्ता, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे शुक्रवारी (दि.७) नमाजदरम्यान एका हायस्कूलच्या परिसरात असलेल्या मस्जिदीत स्फोट झाला आहे. या स्फोटांमध्ये किमान ५४ जण जखमी झाले आहेत, ज्यांपैकी बहुतांश विद्यार्थी आहेत.एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या स्फोटांची पुष्टी केली आहे, परंतु स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट केलेले नाही.

जकार्ता पोलिस प्रमुख असेप ईदी सुहेरी यांनी सांगितले की, “शहरातील एका हायस्कूलच्या परिसरात स्फोट झाला. आमच्याकडे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे ५४ लोक या स्फोटात जखमी झाले आहेत. काहींना किरकोळ इजा झाल्या आहेत, काहींना गंभीर, आणि काहींना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.”

पोलिस प्रमुखांनी सांगितले की, स्फोटानंतर अधिकाऱ्यांनी परिसराला वेढा घातला आहे आणि गुन्हा तपास पथक घटनास्थळी कार्यरत आहे. जकार्ता पोलिसांचे बॉम्ब निष्क्रिय पथक देखील घटनास्थळी पोहोचले असून स्फोटामागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे. सुहेरी यांनी सांगितले की, जखमींच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी दोन रुग्णालयांमध्ये मदत केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

त्यांनी सांगितले, “आम्ही अद्याप तपास करत आहोत कारण ही घटना नुकतीच घडली आहे.”

प्रत्यक्षदर्शींच्या मते, दुपारी सुमारास दोन मोठे स्फोट झाले, नेमक्या त्या वेळी जेव्हा जकार्ताच्या उत्तरेकडील केलापा गाडिंग भागातील नौदलाच्या तळामध्ये असलेल्या सरकारी हायस्कूल ‘एसएमए 72’ च्या मस्जिदीत धर्मोपदेश सुरू झाला होता. स्फोटानंतर मस्जिदीत धूर पसरला आणि भीतीच्या वातावरणात विद्यार्थी व उपस्थित लोक बाहेर पळाले. बहुतेक जखमींना फुटलेल्या काचांच्या तुकड्यांमुळे किरकोळ ते गंभीर जखमा झाल्या आहेत.

जकार्ता पोलिस प्रमुख असेप एडी सुहेरी यांच्या मते, स्फोटाचे कारण अद्याप समोर आलेले नाही, परंतु प्राथमिक तपासात असे दिसते की स्फोट मस्जिदीच्या लाउडस्पीकरजवळून झाले.जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून, काही विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. मात्र, २० विद्यार्थी अजूनही रुग्णालयात आहेत, ज्यांपैकी तीनांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.

घटनास्थळी तपास करताना पोलिसांच्या बॉम्ब निष्क्रिय पथकाला मस्जिदीजवळ खेळण्यातल्या रायफल आणि बंदुका सापडल्या आहेत. सुहेरी यांनी सांगितले, “पोलिस अजूनही स्फोटाचे नेमके कारण शोधत आहेत.” तसेच त्यांनी नागरिकांना विनंती केली की, तपास पूर्ण होण्यापूर्वी या घटनेला ‘हल्ला’ म्हणून संबोधू नये किंवा अफवा पसरवू नयेत. त्यांनी म्हटले, “अधिकाऱ्यांना आपले काम करू द्या. आम्ही जे निष्कर्ष काढू, ते योग्य वेळी सार्वजनिक करू.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande