जरांगेंच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी, दोन संशयित ताब्यात
छत्रपती संभाजीनगर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्याचा कट रचून अडीच कोटींची सुपारी दिल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आली. स्वतः जरांगे पाटील यांनीही पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल या
अ


छत्रपती संभाजीनगर, 7 नोव्हेंबर (हिं.स.)।

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्याचा कट रचून अडीच कोटींची सुपारी दिल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे देण्यात आली.

स्वतः जरांगे पाटील यांनीही पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन चर्चा केली. तक्रारीनुसार पोलिसांनी तातडीने पावले उचलत गेवराईतून दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणानंतर जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट बीड जिल्ह्यात झालेल्या एका बैठकीत रचण्यात आला होता. त्याच बैठकीत असलेल्या समर्थकाने जरांगे पाटील यांना ही बाब सांगितली.

पोलिस अधीक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत गेवराई येथील दोन संशयितांना पथकाच्या माध्यमातून ताब्यात घेतले. त्यातील एक संशयित हा जरांगे पाटील यांचा जुनाच सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.

जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याबाबत जी तक्रार आली होती. त्या तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी सुरू असून, दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आम्ही गांभीर्याने चौकशी करीत असून, चौकशीअंती अधिक माहिती दिली जाईल. जरांगे पाटील यांच्या सुरक्षेबाबतही पोलिस यंत्रणेने आवश्यक पावले उचलली आहेत.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande