पुण्यातील बहुचर्चित जमीन व्यवहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल
पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। पुण्यातील कोंढवा परिसरात ४० एकर जमीन घेतल्याप्रकरणी पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीचे दुसरे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील आणि शितल किशनचंद तेजवानी यासह रवींद्र बाळकृष्ण तारू यांच्या विरोधात गुन्हा दाख
पुण्यातील बहुचर्चित जमीन व्यवहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल


पुणे, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। पुण्यातील कोंढवा परिसरात ४० एकर जमीन घेतल्याप्रकरणी पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या अमेडिया कंपनीचे दुसरे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील आणि शितल किशनचंद तेजवानी यासह रवींद्र बाळकृष्ण तारू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुद्रांक शुल्क अधिकारी संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असलेल्या कंपनीने कवडीमोल भावात महाराष्ट्र शासनाची ४० एकर जमीन विकत घेतल्याच बहुचर्चित प्रकरण नुकत उघडकीस आले आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात मुद्रांक शुल्क अधिकारी यांनी तक्रार दिली असून अमेडिया कंपनीचे दुसरे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील आणि शितल किशनचंद तेजवानी यांच्या विरोधात सहा कोटींचा मुद्रांक शुल्क न भरता आणि शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात.या जमिनीची नोंद बावधान पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. संबंधित ४० एकर जमिनीचा सातबारा हा महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे. अस असताना शासनाची फसवणूक करून कागदपत्र बनवण्यात आली. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६ (५), ३१८(२), ३ (५) सह महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट कलम ५९ प्रमाणे भाधवी कलम ४०९, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande