रेबॅन मेटा स्मार्ट ग्लासेस 21 नोव्हेंबरपासून ई-कॉमर्सवर होणार उपलब्ध
मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। मेटा कंपनीचा पहिला स्मार्ट ग्लासेस मॉडेल ‘रेबॅन मेटा ग्लासेस जन 1’ आता भारतातील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. मे महिन्यात भारतात लॉंच झालेल्या या अत्याधुनिक स्मार्ट आयवेअरला 21 नोव्हेंबरपासून अ‍ॅमेझॉन, फ्लिपका
Rayban Meta Smart Glasses


मुंबई, 7 नोव्हेंबर (हिं.स.)। मेटा कंपनीचा पहिला स्मार्ट ग्लासेस मॉडेल ‘रेबॅन मेटा ग्लासेस जन 1’ आता भारतातील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. मे महिन्यात भारतात लॉंच झालेल्या या अत्याधुनिक स्मार्ट आयवेअरला 21 नोव्हेंबरपासून अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि रिलायन्स डिजिटल वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे. ग्राहकांना 6 नोव्हेंबरपासून ‘नोटिफाय मी’ अलर्टसाठी साइन अप करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

मेटा आणि एसिलोरलक्सोटिका यांच्या सहकार्याने विकसित केलेल्या या ग्लासेसची भारतातील किंमत 29,900 रुपयांपासून सुरू होते. आतापर्यंत या ग्लासेस फक्त रेबॅन इंडिया वेबसाइट आणि निवडक ऑप्टिकल-सनग्लास स्टोअर्समध्येच उपलब्ध होत्या. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्धतेमुळे आता लाखो ग्राहकांना या अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीचा अनुभव घेता येणार आहे.

या स्मार्ट ग्लासेसमध्ये 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असून तो हँड्स-फ्री फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्याची सुविधा देतो. ओपन-ईअर स्पीकर्स आणि पाच मायक्रोफोन्समुळे कॉल्स, व्हॉइस कमांड्स आणि एआय इंटरॅक्शन अत्यंत स्पष्ट होते. ‘हॅलो मेटा’ असा आदेश दिल्यानंतर एआय असिस्टंट सक्रिय होतो आणि वापरकर्त्याला माहिती, स्मार्ट फिचर्स किंवा थेट फेसबुक व इंस्टाग्रामवर लाईव्ह स्ट्रीमिंग करता येते.

डिझाइनच्या बाबतीत हे ग्लासेस क्लासिक रेबॅन स्टाइलमध्ये असून वेफरर, हेडलाइनर आणि इतर व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहेत. यात स्नॅपड्रॅगन AR1 जन 1 प्लॅटफॉर्म असून एका चार्जमध्ये 4 तासांपर्यंत बॅटरी लाइफ मिळते. ‘मेटा व्ह्यू’ अ‍ॅपच्या मदतीने फोटो आणि व्हिडिओ सहज व्यवस्थापित करता येतात. ब्लूटूथ 5.2 आणि वाय-फाय 6 कनेक्टिव्हिटीसह या ग्लासेसचं तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे.

भारतात स्मार्ट वेअरेबल्स आणि स्मार्ट ग्लासेसचा ट्रेंड वेगाने वाढत असताना मेटाची ही एंट्री बाजारात गेम-चेंजर ठरणार आहे. आता ग्राहकांना ऑनलाइन ऑफर्स, ईएमआय आणि डिस्काउंट्ससह हे प्रीमियम स्मार्ट ग्लासेस सहज उपलब्ध होणार असून, तंत्रज्ञान आणि फॅशनप्रेमी युवकांसाठी हे एक आकर्षक गॅझेट ठरण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande