
नांदेड, 7 नोव्हेंबर, (हिं.स.)। 'वंदे मातरम्' या ऐतिहासिक गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज अर्धापूर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीच्या नांदेड महानगरच्या वतीने वंदे मातरम्' या ऐतिहासिक गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सामूहिक गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी माजीमुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण,राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछडे, भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे यांच्यासह भाजपा नांदेड महानगर प्रमुख पदाधिकारी, माजी नगरसेवक मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis