भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे स्वागत केल्याबद्दल पंतप्रधानांकडून भूतानचे नेते-नागरिकांचे कौतुक
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडून भूतानमध्ये गेलेल्या बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे आदरपूर्वक स्वागत केल्याबद्दल, भूतानच्या जनतेचे आणि नेत्यांचे मनापासून कौतुक केले. हे अवशेष शांतता, करुणा आणि सौहार्दाचा कालात
PM Narendra Modi


नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताकडून भूतानमध्ये गेलेल्या बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे आदरपूर्वक स्वागत केल्याबद्दल, भूतानच्या जनतेचे आणि नेत्यांचे मनापासून कौतुक केले. हे अवशेष शांतता, करुणा आणि सौहार्दाचा कालातीत संदेश देत असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी केले आहे. भगवान बुद्धांची शिकवण ही उभय राष्ट्रांच्या सामाईक आध्यात्मिक वारसातील पवित्र दुवा आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमांवरील संदेशात लिहिले आहे की, भारताकडून पाठवण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांचे श्रद्धेने स्वागत केल्याबद्दल भूतानच्या जनतेचे आणि नेतृत्वाचे मनापासून कौतुक.

हे अवशेष शांतता, करुणा आणि सौहार्दाच्या कालातीत संदेशाचे प्रतीक आहेत. भगवान बुद्धांची शिकवण उभय राष्ट्रांच्या सामाईक आध्यात्मिक वारसातील एक आध्यात्मिक पवित्र दुवा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande