जळगाव सराफ बाजारात चांदीचा नवा विक्रम
जळगाव , 11 डिसेंबर (हिं.स.) सध्या लग्नसराईचा सिझन सुरू असून मात्र यातच सोनं- चांदीचे दर दिवाळीनंतर घसरले असताना आता पुन्हा वाढू लागले. विशेष यात जळगाव सराफ बाजारात चांदी दराने नवीन विक्रम गाठला आहे. गेल्या २४ तासात चांदी दरात ३०९० रुपयांची वाढ झाली
जळगाव सराफ बाजारात चांदीचा नवा विक्रम


जळगाव , 11 डिसेंबर (हिं.स.) सध्या लग्नसराईचा सिझन सुरू असून मात्र यातच सोनं- चांदीचे दर दिवाळीनंतर घसरले असताना आता पुन्हा वाढू लागले. विशेष यात जळगाव सराफ बाजारात चांदी दराने नवीन विक्रम गाठला आहे. गेल्या २४ तासात चांदी दरात ३०९० रुपयांची वाढ झाली. यामुळे जळगावच्या सराफा बाजारात १,९३,६४० रुपये किलोवर पोहोचली. यामुळे ऐन थंडीत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे.चीनचे चांदीबद्दलचे बदललेले धोरण, फेड रिझर्व्हची बैठक आणि फिजिकल (हजर) चांदीत अचानक वळालेल्या गुंतवणुकीने चांदीने पुन्हा विक्रम केला. बुधवारी सोन्याच्या दरात मात्र २०६ रुपयांची घसरण होऊन ते १,३९,७३७ रुपये तोळ्यावर स्थिरावले आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याचे भाव स्थिर आहेत. दरम्यान, यावर्षी १ जानेवारीनंतर आजपर्यंत चांदीने ११३ टक्क्यांचा (१,०३,००० रु.) भरघोस परतावा दिला आहे. ऐतिहासिक दोन लाखांच्या दरापासून चांदी फक्त ६३६० रुपये दूर आहे. दिवाळीआधी १५ ऑक्टोबरला आणि ९ डिसेंबरला चांदीने दोन वेळा १,९०,५५० चा उच्चांक गाठला. १ जानेवारी २०२५ ला चांदी ९०,६४० रुपये होती. वर्षअखेरीपर्यंत चांदीने दुपटीपेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. आगामी काळातही चांदीचे दर वाढतेच राहणार असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. ९ डिसेंबरला १,९०,५५० रुपये किलो असलेली चांदी एका दिवसात ३०९० रुपयांनी वाढली. विशेष म्हणजे २६ ऑक्टोबरपासून चांदीत एका दिवसात ३०९० रुपयांची दरवाढ होण्याची ही सहावी वेळ आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande