चॅटजीपीटीमध्ये एडोबची एन्ट्री; आता शब्दांतूनच फोटो आणि पीडीएफ एडिटिंग शक्य
मुंबई, 13 डिसेंबर (हिं.स.)। अमेरिकेची एआय कंपनी ओपनएआयने आपल्या लोकप्रिय चॅटमॉडेल चॅटजीपीटीमध्ये आणखी एक मोठे अपडेट दिले असून आता एडोबचे Photoshop, Adobe Express आणि Acrobat हे टूल्स थेट चॅटजीपीटीमध्ये वापरता येणार आहेत. त्यामुळे चॅटजीपीटी केवळ प्र
Adobe Entry into ChatGPT


Adobe Entry into ChatGPT


मुंबई, 13 डिसेंबर (हिं.स.)। अमेरिकेची एआय कंपनी ओपनएआयने आपल्या लोकप्रिय चॅटमॉडेल चॅटजीपीटीमध्ये आणखी एक मोठे अपडेट दिले असून आता एडोबचे Photoshop, Adobe Express आणि Acrobat हे टूल्स थेट चॅटजीपीटीमध्ये वापरता येणार आहेत. त्यामुळे चॅटजीपीटी केवळ प्रश्नोत्तरांसाठी मर्यादित न राहता, फोटो एडिटिंग, डिझाइनिंग आणि पीडीएफ मॅनेजमेंटसाठी एक संपूर्ण ऑल-इन-वन प्लॅटफॉर्म बनत आहे.

या नव्या फीचरमुळे युजर्सना कोणताही क्लिष्ट इंटरफेस शिकण्याची गरज नाही. फक्त चॅटमध्ये साध्या शब्दांत कमांड दिली की चॅटजीपीटी संबंधित एडोब अ‍ॅप ओपन करून स्टेप-बाय-स्टेप काम करून देतो. उदाहरणार्थ, “Adobe Photoshop माझ्या फोटोचा बॅकग्राउंड ब्लर करा” असे लिहिल्यावर फोटोशॉपमध्ये ते एडिटिंग थेट केली जाईल.

सध्या हे फीचर डेस्कटॉप, वेब आणि iOS युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. अँड्रॉइडवर सध्या फक्त Adobe Express सपोर्ट करत असून, लवकरच Photoshop आणि Acrobat चाही सपोर्ट मिळणार आहे. अडोबी डिजिटल मीडियाचे अध्यक्ष डेव्हिड वॅडवानी यांनी सांगितले की, आता कोट्यवधी लोक फक्त आपल्या शब्दांच्या मदतीने Photoshop मध्ये एडिटिंग करू शकतील आणि तेही त्यांच्या दैनंदिन वापरातील प्लॅटफॉर्मवर.

चॅटजीपीटीमध्ये एडोब टूल्सच्या मदतीने फोटोमधील एखादा भाग एडिट करणे, ब्राइटनेस, कॉन्ट्रास्ट आणि एक्सपोजर ट्यून करणे, ग्लो किंवा ग्लिचसारखे क्रिएटिव्ह इफेक्ट्स लावणे शक्य होणार आहे. Adobe Express द्वारे हजारो प्रोफेशनल डिझाइन्स ब्राउझ करता येतील, टेक्स्ट आणि इमेज बदलता येतील, डिझाइन्स अ‍ॅनिमेट करता येतील तसेच सोशल मीडिया पोस्ट, पोस्टर किंवा कार्डसाठी झटपट कंटेंट तयार करता येईल. Acrobat च्या माध्यमातून पीडीएफ एडिट करणे, टेक्स्ट किंवा टेबल एक्सट्रॅक्ट करणे, अनेक फाइल्स मर्ज करणे, डॉक्युमेंट कॉम्प्रेस किंवा कन्व्हर्ट करणे आणि संवेदनशील माहिती रेडॅक्ट करणेही सहज शक्य होणार आहे.

हे सर्व फीचर्स चॅटजीपीटीच्या एजेंटिक एआय आणि एडोबच्या Model Context Protocol च्या मदतीने कार्य करतात. विशेष म्हणजे Photoshop, Adobe Express आणि Acrobat हे टूल्स युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

एडोबचे हे इंटिग्रेशन विशेषतः त्या युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, जे आतापर्यंत एडोबच्या जड इंटरफेसमुळे एडिटिंगपासून दूर राहत होते. आता फक्त टाइप करून किंवा सांगूनही प्रोफेशनल दर्जाचे एडिटिंग करता येणार असल्याने, कंटेंट क्रिएटर्स, विद्यार्थी आणि सामान्य युजर्ससाठी हे अपडेट मोठी सोय ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande