चॅटजीपीटी २०२५ सालचा सर्वाधिक डाउनलोड केलेला ॲप बनला
मुंबई, 13 डिसेंबर (हिं.स.)। 2025 हे वर्ष संपत असताना जगभरातील अ‍ॅप डाउनलोड्सच्या यादीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. अनेक वर्षांपासून टिकटॉक, इंस्टाग्राम आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया अ‍ॅप्सकडे असलेला नंबर-1 अ‍ॅपचा मुकुट यंदा पहिल्यांदाच एका
ChatGPT


मुंबई, 13 डिसेंबर (हिं.स.)। 2025 हे वर्ष संपत असताना जगभरातील अ‍ॅप डाउनलोड्सच्या यादीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. अनेक वर्षांपासून टिकटॉक, इंस्टाग्राम आणि फेसबुक यांसारख्या सोशल मीडिया अ‍ॅप्सकडे असलेला नंबर-1 अ‍ॅपचा मुकुट यंदा पहिल्यांदाच एका एआय अ‍ॅपने पटकावला आहे. ओपनएआयचे चॅटजीपीटी हे 2025 मधील जगातील सर्वाधिक डाउनलोड होणारे अ‍ॅप ठरले असून त्याने सोशल मीडिया दिग्गजांनाही मागे टाकत आपली स्पष्ट बादशाहत सिद्ध केली आहे.

अ‍ॅपमॅजिकच्या ताज्या अहवालानुसार, जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत चॅटजीपीटीला तब्बल 902 मिलियनहून अधिक डाउनलोड्स मिळाले आहेत. हे आकडे टिकटॉक पेक्षा सुमारे 200 मिलियन आणि इंस्टाग्राम पेक्षा जवळपास 380 मिलियन अधिक आहेत. विशेष म्हणजे केवळ अडीच वर्षांत चॅटजीपीटीने असा टप्पा गाठला आहे, जो सोशल मीडिया कंपन्यांना गाठण्यासाठी अनेक वर्षांचा काळ लागला होता. सध्या चॅटजीपीटीचे एकूण लाइफटाइम इंस्टॉल्स सुमारे 1.5 बिलियनच्या आसपास पोहोचले असून, एआय तंत्रज्ञान आता केवळ टेक एक्स्पर्ट्सपुरते मर्यादित न राहता सर्वसामान्यांच्या रोजच्या डिजिटल जीवनाचा भाग बनल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

चॅटजीपीटी इतक्या वेगाने पुढे जाण्याचे मुख्य कारण म्हणजे जनरेटिव्ह एआयचा प्रत्यक्ष दैनंदिन वापरात झालेला प्रवेश. सुरुवातीला एआय ही संकल्पना फक्त तंत्रज्ञान क्षेत्रातील लोकांपुरती मर्यादित मानली जात होती, मात्र चॅटजीपीटी मुळे लेखन, अभ्यास, ऑफिस काम, माहिती शोध, कल्पना मांडणी अशा अनेक गरजांसाठी एआयचा वापर सामान्य लोक करू लागले आहेत. इंटरनेट जसा काळानुसार जीवनाचा अविभाज्य भाग झाला, तसाच एआय देखील आता अपरिहार्य ठरत असल्याचे या ट्रेंडवरून दिसून येते.

अ‍ॅपमॅजिकच्या डेटानुसार 2025 मध्ये डाउनलोड्सच्या शर्यतीत टिकटॉक 703 मिलियन, इंस्टाग्राम 521.6 मिलियन, व्हॉट्सॲप 444 मिलियनहून अधिक आणि फेसबुक 404 मिलियनहून अधिक डाउनलोड्ससह मागे राहिले आहेत. Temu टॉप-5 मध्ये असून Google चे Gemini हे टॉप-10 मध्ये स्थान मिळवणारे एकमेव दुसरे एआय अ‍ॅप ठरले आहे. Gemini ला यंदा सुमारे 392 मिलियन डाउनलोड्स मिळाले आहेत.

दरम्यान, TechGaged च्या संशोधनानुसार नोव्हेंबर 2025 पर्यंत जागतिक एआय चॅटबॉट मार्केटपैकी जवळपास 82 टक्के हिस्सा एकट्या चॅटजीपीटी कडे आहे. हा वाटा त्याच्या टॉप पाच प्रतिस्पर्ध्यांच्या एकत्रित वाट्यापेक्षाही चारपट जास्त आहे. डीपसीक आणि Perplexity यांसारखे नवे एआय चॅटबॉट्स बाजारात येत असले तरी सध्या चॅटजीपीटीची आघाडी अत्यंत मजबूत असून पुढील वर्षातही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande