भाजपाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड
नवी दिल्ली, १४ डिसेंबर (हिं.स.) : बिहार सरकाराचे मंत्री नितीन नबीन यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आज, 14 डिसेंबर रोजी करण्यात आली असून, ती तात्काळ लागू झाली आहे. भाजपाच्या संसदीय मंडळाच्या
नितीन नबीन


नवी दिल्ली, १४ डिसेंबर (हिं.स.) : बिहार सरकाराचे मंत्री नितीन नबीन यांची भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती आज, 14 डिसेंबर रोजी करण्यात आली असून, ती तात्काळ लागू झाली आहे.

भाजपाच्या संसदीय मंडळाच्या निर्णयानुसार ही जबाबदारी नितीन नबीन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव, पक्षातील दीर्घकाळची वाटचाल आणि प्रशासनावरील मजबूत पकड या बाबी लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांची निवड केली आहे. नितीन नबीन हे बिहार विधानसभेतील बांकीपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. विद्यार्थी राजकारणापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली असून, भाजपामध्ये विविध संघटनात्मक पदांवर काम केले आहे. सध्या ते बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड गेल्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर पडत आहे. अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा होत असताना पक्ष संघटनेतील काही तांत्रिक बाबींमुळे ही निवड लांबणीवर पडत असल्याचं दिसत आहे. भाजपा संघटनेत ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, आगामी राजकीय रणनीती आणि संघटनात्मक मजबुतीकरणाच्या दृष्टीने नितीन नबीन यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande