राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या जलतरणपटूंचे सुयश
रत्नागिरी, 17 डिसेंबर, (हिं. स.) : महाराष्ट्र अॅक्वॅटिक असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय ओपन सागरी जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या जलतरणपटूंनी सुयश मिळविले. सिंधुदुर्गात मालवण येथील चिवला बीचवर झालेल्या या या स्पर्धेत रत्नागिरीतील 9 जलतरणपटूंनी सहभाग घेऊन
राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या जलतरणपटूंचे सुयश


रत्नागिरी, 17 डिसेंबर, (हिं. स.) : महाराष्ट्र अॅक्वॅटिक असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय ओपन सागरी जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या जलतरणपटूंनी सुयश मिळविले.

सिंधुदुर्गात मालवण येथील चिवला बीचवर झालेल्या या या स्पर्धेत रत्नागिरीतील 9 जलतरणपटूंनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली, सर्व स्पर्धक मागील दोन महिन्यांपासून भाट्ये येथील समुद्रामध्ये सराव करत होते. मालवण समुद्रातील जेलीफिश, अत्यंत थंड पाणी, मोठ्या लाटा यांमुळे अतिशय खडतर मानली जाणाऱ्या स्पर्धेत राज नितीन राऊत, यश देवदास, आयुष चव्हाण, श्रीयांश वाघाटे, रत्नराज पाटील, रुद्र लाड, ऑस्टिन फ्रँको, जतीन भोसले यांनी स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. राज्यभरातून सुमारे दीड हजार स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते.

स्पर्धेत १२ वर्षांतील गटामध्ये 2 किलोमीटर, 14 वर्षांखालील गटामध्ये 3 किलोमीटर आणि 25 वर्षांखालील गटामध्ये 5 किलोमीटर स्पर्धा झाली. यामध्ये 25 वर्षांखालील गटामध्ये ॲक्वाटेक्निक स्विमिंग अकादमीच्या यश देवदासने 5 किलोमीटर स्पर्धेत टॉप 10 मध्ये फिनिश करून नववा क्रमांक मिळवून रत्नागिरीला पदक मिळवून दिले.

सर्व जलतरणपटूंना एआयएस, एसएफआय , एएससीए सर्टिफाईड कोच विवेक विलणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande