एनआयएफटीने २०२६–२७ साठी प्रवेश अर्जाच्या शुल्कात केली कपात
नवी दिल्ली, 19 डिसेंबर (हिं.स.)। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) ने फॅशन डिझाईन, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या 2026-27 च्या तुकडीसाठी प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज भ
NIFT


नवी दिल्ली, 19 डिसेंबर (हिं.स.)। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) ने फॅशन डिझाईन, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाच्या विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या 2026-27 च्या तुकडीसाठी प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2026 आहे. (विलंब शुल्कासह 7 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत) आणि परीक्षेची तारीख 8 फेब्रुवारी 2026 आहे. सीबीटी आणि पेन-पेपरवर आधारित अखिल भारतीय प्रवेश परीक्षेचे आयोजन राष्ट्रीय चाचणी एजन्सी द्वारे देशभरातील 100 हून अधिक शहरांमध्ये केले जाईल.

2026-27 च्या तुकडीसाठी, खुल्या, इतर मागासवर्गीय -नॉन क्रिमी लेअर (ओबीसी एनसीएल) आणि खुल्या-आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट (ओपन -ईडब्ल्यूएस) श्रेणीतील उमेदवारांसाठी शुल्क 3,000/- रुपयांवरून 2,000/- रुपयांपर्यंत कमी करण्यात आले आहे तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 1,500/- वरून 500 रुपयांपर्यंत शुल्क कमी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande