परभणी -सेलू नगरपालिकेत 67.71 टक्के मतदान
परभणी, 2 डिसेंबर (हिं.स.)। सेलू नगरपालिकेत नगराध्यक्षासह सदस्यपदाकरीता एकूण मतदारांपैकी 67.71 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पालिकेंतर्गत एकूण 13 प्रभागात 22 हजार 600 महिला तर 22 हजार 384 पुरुष व अन्य 9 असे एकूण 44 हजार 993 एवढे मतदा
परभणी -सेलू नगरपालिकेत 67.71 टक्के मतदान


परभणी, 2 डिसेंबर (हिं.स.)। सेलू नगरपालिकेत नगराध्यक्षासह सदस्यपदाकरीता एकूण मतदारांपैकी 67.71 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पालिकेंतर्गत एकूण 13 प्रभागात 22 हजार 600 महिला तर 22 हजार 384 पुरुष व अन्य 9 असे एकूण 44 हजार 993 एवढे मतदार आहेत. त्यापैकी 15 हजार 756 महिला, 14 हजार 700 पुरुष व अन्य 7 अशा एकूण त्यापैकी 30 हजार 463 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महिला मतदारांचे प्रमाण 69.72, पुरुष मतदारांचे प्रमाण 65.67 टक्के तर एकूण मतदान 67.71 टक्के झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande