भारताच्या पहिल्या 'इमर्सिव्ह युनिव्हर्स'चा कल्याणमध्ये शुभारंभ
कल्याण, २० डिसेंबर (हिं.स.) : मनोरंजन क्षेत्रातील जागतिक दर्जाचा अनुभव आता थेट कल्याणकरांच्या दारात आला आहे. कल्याणमधील मेट्रो जंक्शन मॉलमध्ये भारताचे पहिले ''इमर्सिव्ह युनिव्हर्स'' असलेल्या ''झिंगव्हर्स''च्या शुभारंभाची शुक्रवारी मोठी घोषणा
झिंगव्हर्स कल्याण मेट्रो जंक्शन मॉल


झिंगव्हर्स कल्याण मेट्रो जंक्शन मॉल


झिंगव्हर्स कल्याण मेट्रो जंक्शन मॉल


कल्याण, २० डिसेंबर (हिं.स.) : मनोरंजन क्षेत्रातील जागतिक दर्जाचा अनुभव आता थेट कल्याणकरांच्या दारात आला आहे. कल्याणमधील मेट्रो जंक्शन मॉलमध्ये भारताचे पहिले 'इमर्सिव्ह युनिव्हर्स' असलेल्या 'झिंगव्हर्स'च्या शुभारंभाची शुक्रवारी मोठी घोषणा केली. वेस्ट पायोनियर प्रॉपर्टीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडतर्फे हे अद्भुत विश्व साकारले असून तब्बल २५,००० स्क्वेअर फुटांच्या विस्तीर्ण जागेत पसरलेले आहे. हे केंद्र केवळ एक संग्रहालय नसून, कला, विज्ञान आणि कल्पनाशक्तीचा एक अनोखा संगम आहे. कुटुंब, तरुण पिढी आणि लहान मुले अशा सर्व वयोगटातील लोकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.

झिंगव्हर्समध्ये प्रवेश करताच अभ्यागतांना एका वेगळ्याच जगात पाऊल ठेवल्याचा भास होतो. हे एक बहु-संवेदी वातावरण आहे, जिथे प्रकाश, ध्वनी आणि जागा मानवी उपस्थितीला प्रतिसाद देतात. या ठिकाणी ३६०° प्रोजेक्शन असलेले 'झिंगडम' हे प्रवेशद्वार अंतराळाची सफर घडवते, तर 'झिंगलो' हे जैविक प्रकाश देणाऱ्या काल्पनिक जंगलासारखे भासते, जे विशेषतः लहान मुलांसाठी आणि फोटोग्राफी प्रेमींसाठी पर्वणीच आहे. याशिवाय, 'झिंगफिनिटी' हे क्षेत्र आरशांच्या आणि प्रकाशाच्या भ्रमातून एक अनंत विश्व निर्माण करते, जे सध्याच्या 'रील्स' आणि सोशल मीडिया युगातील कंटेंट क्रिएटर्ससाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जात आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल माहिती देताना वेस्ट पायोनियर प्रॉपर्टीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव अग्रवाल म्हणाले की, झिंगव्हर्सची संकल्पना ही कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी आणि लोकांमधील कुतूहल जागृत करण्यासाठी आखली गेली आहे. जागतिक दर्जाचा अनुभव घेण्यासाठी आता परदेशात जाण्याची किंवा मोठ्या मेट्रो शहरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. कल्याण हे आता मुंबई महानगर क्षेत्रातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास येत असून, झिंगव्हर्समुळे या शहराला अनुभवात्मक पर्यटनाच्या नकाशावर जागतिक ओळख मिळणार आहे.

या केंद्राचे मुख्य परिचालन अधिकारी नितीन म्हात्रे यांनी सांगितले की, येथे एकूण २५ पेक्षा जास्त आकर्षणे असून प्रत्येक कोपरा काहीतरी नवीन शोधण्याची संधी देतो. सुरक्षितता आणि मनोरंजनाचा योग्य ताळमेळ साधत हे ठिकाण मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक संस्मरणीय सहलीचे ठिकाण ठरेल. उद्घाटन सोहळ्यानिमित्त पर्यटकांना विशेष सवलतींचाही लाभ घेता येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande