भारताला पुढील टप्प्यावर नेण्याची जबाबदारी युवकांवर : डॉ. जयशंकर
पुणे, 20 डिसेंबर (हिं.स.)। आज भारताची ओळख ही त्याच्या प्रतिभा आणि कौशल्यांमुळे निर्माण झाली आहे. आपल्या राष्ट्रीय प्रतिमेला बळकटी मिळाली असून भारतीय व्यावसायिकांना त्यांच्या मेहनती वृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांमुळे जगभर मान्यता मिळत आहे,” असे प्रत
Jaysank


पुणे, 20 डिसेंबर (हिं.स.)।

आज भारताची ओळख ही त्याच्या प्रतिभा आणि कौशल्यांमुळे निर्माण झाली आहे. आपल्या राष्ट्रीय प्रतिमेला बळकटी मिळाली असून भारतीय व्यावसायिकांना त्यांच्या मेहनती वृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांमुळे जगभर मान्यता मिळत आहे,” असे प्रतिपादन परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केले.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) चा २२ वा पदविदान समारंभ शनिवारी सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे, पुणे कॅम्पस येथे संपन्न झाला. मंत्री डॉ. एस. जयशंकर, या दीक्षांत समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थापक आणि अध्यक्ष, सिंबायोसिस आणि कुलपती, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत विद्यापीठ) हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. जयशंकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि गेल्या काही दशकांत भारत व जगात झालेल्या परिवर्तनाचा आढावा घेतला. “आज पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे व्यापक ज्ञानसंपदा, अधिक आत्मविश्वास आणि वेगळे कौशल्यसंच आहे. भारताला पुढील टप्प्यावर नेण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे,” असे ते म्हणाले.

जागतिकीकरणाच्या परिणामांविषयी बोलताना डॉ. जयशंकर यांनी सांगितले की, जागतिकीकरणामुळे संधींचे क्षितिज विस्तारले असले, तरी त्याचबरोबर जगातील संधी व धोके यांची जाणीव ठेवणेही आवश्यक आहे. “जागतिकीकरणामुळे तुमच्या संधी वाढल्या आहेत; मात्र जागतिक पातळीवरील बदलांचे भान ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी नमूद केले. आजचे जग अधिक परस्परसंबंधित झाले असून तरुण व्यावसायिकांना वाढत्या प्रमाणात जागतिक कार्यस्थळी काम करावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भारताच्या परराष्ट्र धोरणाचा उल्लेख करताना डॉ. जयशंकर यांनी धोरणात्मक स्वायत्तता आणि राष्ट्रीय हिताचे महत्त्व अधोरेखित केले. “परस्पर सहमतीच्या अजेंड्यांवर भागीदार राष्ट्रांसोबत कार्य करताना निर्णयस्वातंत्र्य आणि स्वायत्तता जपण्याचा भारताचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी सांगितले.

डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित करत यशस्वी आणि अर्थपूर्ण जीवनासाठी तीन मूलभूत तत्त्वे मांडली. “धैर्यपूर्ण नवोन्मेष, कमी सुदैवी लोकांप्रती करुणा आणि आपल्या कार्यातील उत्कटता ही केवळ यशासाठीच नव्हे, तर आनंदासाठीही आवश्यक आहेत,” असे ते म्हणाले.विद्यार्थ्यांनी आपल्या मातृसंस्थेशी नाते कायम ठेवावे, असे आवाहन करताना डॉ. मुजुमदार यांनी विद्यापीठाला दुसरे घर संबोधले. “तुमच्याकडे दोन माता आहेत—एक जन्म देणारी आणि दुसरी तुमच्या विचारांना व व्यक्तिमत्त्वाला घडवणारी ही विद्यापीठ संस्था. विद्यापीठाशी नेहमी जोडलेले राहा,” असे त्यांनी सांगितले. सिंबायोसिस मधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांविषयी समाधान व्यक्त करताना त्यांनी त्यांना सद्भावनेचे दूत संबोधले. “

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande