मराठी, लोकवाडःमयाची जन्मभूमी मराठवाडा होय - कौतिकराव ठाले पाटील
छत्रपती संभाजीनगर, 20 डिसेंबर (हिं.स.)। मराठी विभागात पुस्तक प्रकाशन आद्यकविश मुकुंदराजापासून ते संत रामदासापर्यंतचे अनेक संत, लोकसाहित्यिक मराठवाडयातच जन्माला आले. मराठी भाषा व लोकवाडःमयाची जन्मभूमी देखील ख-या अर्थाने मराठवाडाच आहे, असे प्रतिपा
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 डिसेंबर (हिं.स.)।

मराठी विभागात पुस्तक प्रकाशन

आद्यकविश मुकुंदराजापासून ते संत रामदासापर्यंतचे अनेक संत, लोकसाहित्यिक मराठवाडयातच जन्माला आले. मराठी भाषा व लोकवाडःमयाची जन्मभूमी देखील ख-या अर्थाने मराठवाडाच आहे, असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी भाषा व वाङ्मय विभागातर्फे प्रकाशित प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील लिखित ''छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची साहित्यिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि परंपरा'' या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे भाषा संचालक अरुण वा. गीते यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले. मराठी विभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष, लेखक प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कुलसचिव प्रा.प्रशांत अमृतकर व मराठी विभागप्रमुख डॉ. दासू वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाटील म्हणाले, तुकारात महाराजांच्या उदयापर्यंत मराठवाडयाबाहेर उर्वरित महाराष्ट्रात लक्षणीय नोंद घ्यावी असे वाड्ःमय निर्माण झालेले नाही. जे काही झाले ते मराठवाडयात झाले. त्यातही पैठण परिसरात सर्वाधिक झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाले. ते येथील आपल्या पूर्वसूरींनी निर्माण केले. म्हणून मोठया प्रमाणात लोकसाहित्य इथेच निर्माण झाले. त्याचे कारण मराठीचा उगमच इथे झालेला आहे. आद्यकवि मुकुंदराज, श्री चक्रधर, नामदेव, ज्ञानेश्वर, जनाबाई, मुक्ताबाई, महदंबा, म्हाइंभट, नरेंद्र पंडित, भास्कर भट्ट बोरीकर, एकनाथ, दासोपंत, मुक्तेश्वर, रामदास इत्यादी वाड्ःमयकारांच्या येथील साहित्कि कर्तत्वामुळे मराठी भाषा इथेच जन्मली याची साक्ष पटते. मराठवाडा व छत्रपती संभाजीनगरच्या प्राचीन इतिहास व परंपरेबद्दल ते म्हणाले, इंद्रप्रस्थ, पाटलीपूत्र अर्थात आजचे दिल्ली, पाटना या प्रमाणेच या शहरालाही जवळपास हजार वर्षांचा इतिहास आहे. उर्दूतील देखील नामवंत शायर या ठिकाणी निर्माण झाले. मात्र बशर नवाज यांच्यानंतर ऊर्दु शायरी निर्माण होत नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. मराठवाडयाची बहु सांस्कृतिकता टिकवून ठेवणे गरजेचे आहे, असेही प्राचार्य ठाले म्हणाले.

महाराष्ट्र राज्य भाषा संचालकनाच्यावतीने बोली भाषा, व्याकरण, शब्दकोष या संदर्भात मोठे काम सुरु आहे. आगामी वर्षी १४ ते २८ जानेवारी या काळात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडयात बोली भाषेसंदर्भात कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. असे भाषा संचालक अरुण गिते म्हणाले. या संदर्भात राज्यातील विविध विद्यापीठात प्राध्यापक, भाषा शिक्षकांच्या बैठक घेऊन मंथन करण्यात येत आहे. विभागाच्यावतीने व्याकरण साहित्य, परिभाषा कोश आदींची निर्मिती करण्यात आल्याचेही ते म्हणाले. तर मराठी विभागाला दैदिव्यमान परंपरा असून लोकवाडःमय, समीक्षा, दलित वाडःमय, संत साहित्य यासाठी विभगाचे मोठे योगदान आहे, असे विभागप्रमुख डॉ.दासू वैद्य म्हणाले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande