ठाणे - गाईल्स शिल्ड' स्पर्धेत पार्थ राऊतची 'हॅट्ट्रीक'; पाच चेंडूत पाच बळी
ठाणे, 20 डिसेंबर (हिं.स.) १४ वर्षांखालील मुलांच्या गाईल्स शिल्ड'' स्पर्धेत मरीन लाईन्स येथील ब्लॉसम स्कूल विरुद्ध ठाणे येथील ''लोकपूरम स्कूल'' यांच्यामध्ये सामना रंगला. लोकपूरम संघाने हा सामना एकतर्फी जिंकला. ''ब्लॉसम स्कूल''ने नाणेफेक जिं
गाईल्स शिल्ड' स्पर्धेत पार्थ राऊतची 'हॅट्ट्रीक'


ठाणे, 20 डिसेंबर (हिं.स.) १४ वर्षांखालील मुलांच्या गाईल्स शिल्ड' स्पर्धेत मरीन लाईन्स येथील ब्लॉसम स्कूल विरुद्ध ठाणे येथील 'लोकपूरम स्कूल' यांच्यामध्ये सामना रंगला. लोकपूरम संघाने हा सामना एकतर्फी जिंकला. 'ब्लॉसम स्कूल'ने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करीत सामन्यात लोकपूरम स्कूलच्या पार्थ राऊतने पाच चेंडूत पाच बळी घेत 'हॅट्ट्रीक' साधली. तर निशांत जाधवने तीन बळी घेतले. 'ब्लॉसम स्कूल' २४ व्या षटकात सर्व विकेटसह फक्त ९० धावा करू शकले.

'लोकपुरम'ने 'ब्लॉसम'चा केवळ एक गड्याच्या मोबदल्यात ९१ धावा ठोकून विजय पटकवला. निशांतने ३४ चेंडूत ७० धावा ठोकल्या. 'लोकपूरम'ने ११ षटकात ९१ धावांचा पाठलाग करीत सामना एक गड्याच्या मोबदल्यात सामना जिंकला. श्री. बकुल अवरानी, विश्वस्त आणि प्रशासक व सौ. मंजुषा बापट, मुख्याध्यापिका यांच्या योगदानामुळे आणि क्रिकेट कोच श्री. राहुल गिरी व श्री राकेश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली लोकपूरम शाळेने ही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande