बीड जिल्ह्यात परळी मुंडेंकडे, बीड अजितदादांकडे, अंबाजोगाई मुंदडा
बीड, 21 डिसेंबर (हिं.स.)। बीड नगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामातून बीडकरांनी परिवर्तन घडवत क्षीरसागरांची एकाधिकारशाही संपवली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे 3 हजार 779 मतांनी नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. माजी आमदार अमरसिं
Q


बीड, 21 डिसेंबर (हिं.स.)।

बीड नगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामातून बीडकरांनी परिवर्तन घडवत क्षीरसागरांची एकाधिकारशाही संपवली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रेमलता पारवे 3 हजार 779 मतांनी नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हातातून गेवराई निसटली असली तरी बीडमध्ये धक्कादायक कामगिरी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये नगरपालिका निवडणुकीत आपलाच वर चष्मा असावा, असे समजून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे तरी न प निवडणुकीत रंगत चढली गेली. भाजपला संजीवनी मिळाल्यामुळे नगरसेवक पदाच्या 14 जागा मिळवता आल्या. त्यानंतर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बीडमध्ये बळ देण्याचं काम केलं. परिवर्तनासाठी स्वतःची यंत्रणा कामाला लावली. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांनी सोशल इंजिनिअरिंग चा वापर करत नगराध्यक्षपदाच्या विजयाची माळ पदरात पाडून घेतली. त्यांना 35 हजार 812 मत पडली. मतमोजणीच्या जवळपास दहाव्या फेरीपर्यंत भाजपने चुरशीची लढत दिली. निकालाच्या शेवटच्या क्षणापर्यंत विजय कोणाचा होईल हे सांगणं अवघड झाल्यामुळे लोकसभेची पुनरावृत्ती बीडमध्ये पाहायला मिळाली.आ. संदीप क्षीरसागर यांनी निवडणुकीत शहर पिंजून काढलं असलं तरी यंत्रणा काही प्रमाणात कमी पडली. अति आत्मविश्वास पराभवाला कारणीभूत ठरला. भाजप उमेदवार डॉ. ज्योती घुमरे यांना 35 हजार 33 मत पडली तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या स्मिता वाघमारे यांना 25 हजार 440 मत पडली.

या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार — 18 ,भाजप — 14 राष्ट्रवादी शरद पवार – 11 शिवसेना ठाकरे गट – 01, शिवसेना शिंदे गट – 03,एमआयएम – 02 ,काँग्रेस – 01 असे नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आले आहेत.

गेवराईत पंडित गटाचा मोठा पराभव झाला. गेवराई येथे गीता पवार निवडून आल्या .भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांनी विजय मिळवला.

अंबाजोगाईत पापा मोदींना झटका

बसला. आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी विजय मिळवला.अंबाजोगाई नगरपालिकेच्या निवडणुकीत ते निवडून आले.

धारुरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला. भाजपाला पराभव मिळाला. परळीत धनंजय मुंडे यांना यश मिळाले . पद्मश्री

धर्माधिकारी यांच्या विजयाची घोषणा झाली .भाजपाने दणदणीत विजय मिळवला.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande