
लातूर, 21 डिसेंबर, (हिं.स.)। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये लातूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून ५ पैकी ४ नगराध्यक्ष पदांवर विजय मिळवला आहे. तर औशामध्ये 'अजित पवार' गटाने आपले खाते उघडले आहे.
विजयी उमेदवारांची अधिकृत यादी:
निलंगा: संजय हलगरकर (भाजप)
उदगीर: स्वाती हुडे (भाजप)
अहमदपूर: स्वप्नील व्हते (भाजप)
रेणापूर: शोभा अकनगिरे (भाजप)
औसा: परवीन शेख (राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट)
लातूरच्या जनतेने विकासाच्या राजकारणाला कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट होत आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis