
महायुतीसह मविआचे नगराध्यक्ष विजयी
छत्रपती संभाजीनगर, 21 डिसेंबर (हिं.स.)।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूकीत धक्कादायक निकाल लागले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये नगराध्यक्षपदाचे विजयी उमेदवार
सिल्लोड...समीर सत्तार शिंदे यांची शिवसेना सिल्लोड इथून विजयी...
वैजापूर- दिनेश परदेशी भाजप वैजापूर येथून विजयी.
फुलंब्री.- ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे विजय.
गंगापूर.- अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय जाधव विजय.
खुलताबाद.
- काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमीर पटेल विजय.
पैठणमध्ये नगराध्यक्षपदी विद्या भूषण कावसानकर विजयी.
वैजापूर नगरपरिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांनी ६,२८८ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवत वैजापूरची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्यांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान आमदार रमेश बोरनारे यांचे सख्खे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव केला.बोरनारे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का बसला आहे
आमदार रमेश बोरनारे यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र, मतदारांनी डॉ. दिनेश यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केल्याने बोरनारे कुटुंबासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या २५ जागांसाठी झालेल्या मतदानात संमिश्र कल पाहायला मिळाला. यामध्ये भाजपने सर्वाधिक ११ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेनेने (शिंदे गट) १० आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ४ जागा पटकावल्या आहेत. जरी नगराध्यक्ष भाजपचा असला, तरी सभागृहात सत्तेसाठी इतर मित्रपक्षांची मदत महत्त्वाची ठरणार आहे.
प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादीः
नगराध्यक्षः डॉ. दिनेश परदेशी, भाजपा
प्रभाग १- पारस घाटे, सुमैया बक्ष शिवसेना, भाजपा
प्रभाग २- मोनाली खैरे, विशाल संचेती भाजपा, भाजपा
प्रभाग ३- पूजा त्रिभुवन, रियाज
फुलंब्रीनगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह नगर परिषदेतही बहुमत मिळवले. उद्धव सेनेचे उमेदवार राजेंद्र ठोंबरे यांनी भाजपा उमेदवार सुहास सिरसाट यांचा तब्बल १,७९७ मतांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. मागील निवडणुकीत सिरसाट यांनी अवघ्या १९० मतांनी मिळवलेला विजय यंदा महाविकास आघाडीने मोठ्या फरकाने उलटवून टाकला.
ठोंबरे यांना एकूण ८,२१७ मते पडली तर सिरसाट यांना ६,४१७मतांवर समाधान मानावे लागले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis