
रत्नागिरी, 21 डिसेंबर, (हिं. स.) : राजापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीला एका मताने सत्ता प्रस्थापित करता आली. नगरसेवक पदाच्या २० जागांपैकी महायुती आणि महाआघाडीला प्रत्येकी १० जागा मिळाल्या, तर नगराध्यपदी काँग्रेसच्या म्हणजे महाआघाडीच्या हुस्नबानू खलिफे निवडून आल्याने सत्ता महाविकास आघाडीकडे गेली.
विशेष म्हणजे राजापूर पालिकेत काँग्रेसचे मायलेक निवडून आले आहेत. नगराध्यक्ष हुस्नबानू खलिफे यांचा मुलगा जमीन प्रभाग ६ मधून नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. महाआघाडीमधील
काँग्रेसला ७, तर शिवसेना उबाठा गटाला ३ जागा मिळाल्या. महायुतीमध्ये शिवसेनेला ९, तर भाजपला एक जागा मिळाली.
राजापूर पालिकेचा प्रभागनिहाय निकाल असा -
थेट नगराध्यक्ष - खलिफे हुस्नबानू निझामुद्दीन (कॉंग्रेस)
प्रभाग क्र. १ अ -
रावण सान्वी सचिन – शिवसेना
प्रभाग क्रमांक १ ब -
खडपे सौरभ संजय – शिवसेना
प्रभाग क्र.२ अ -
चव्हाण दिलीप दिवाकर - शिवसेना
प्रभाग क्रमांक २ ब -
सौ. जठार सुयोगा सुनील - भाजपा
प्रभाग क्र.३ अ -
तानवडे नेहा प्रमोद - उबाठा
प्रभाग क्रमांक ३ ब -
गुरव विनय सदाशिव - उबाठा
प्रभाग क्र.४ अ -
बाकाळकर उर्मिला अमोल - शिवसेना
प्रभाग क्रमांक ४ ब -
अमरे दिलप लक्ष्मण - शिवसेना
प्रभाग क्र. ५ अ -
जाधव सिद्धांत नाना – कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक ५ ब -
मुल्ला शबाना निसार – कॉंग्रेस
प्रभाग क्र.६ अ -
झारी अफरोज महंमद – कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक ६ ब -
खलिफे जमीर निझामुद्दिन – कॉंग्रेस
प्रभाग क्र. ७ अ -
गडकरी अमिना अशफाक – कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक ७ ब -
ठाकूर सुलतान शरफुद्दीन – कॉंग्रेस
प्रभाग क्र. ८ अ -
नार्वेकर प्रेरणा प्रशांत – शिवसेना
प्रभाग क्रमांक ८ ब -
राहुल रमाकांत तांबे – शिवसेना
प्रभाग क्र.९ अ -
वादक जान्हवी गिरीश – कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक ९ ब -
पवार सुबोध सुभाष – उबाठा
प्रभाग क्र.१० अ -
सौरभ संदीप पेणकर – शिवसेना
प्रभाग क्रमांक १० ब -
काझी साजिया हनिफ – शिवसेना
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी