पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जागी भाजप विजयी
* काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व ! पुणे, २१ डिसेंबर (हिं.स.) - सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जागी भाजप विजयी झाला असून काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व राहिले होते. कोल्हापूर जिल्ह्यात १० नगरपा
भाजपा


* काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व !

पुणे, २१ डिसेंबर (हिं.स.) - सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक जागी भाजप विजयी झाला असून काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व राहिले होते.

कोल्हापूर जिल्ह्यात १० नगरपालिका आणि ३ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे जयसिंगपूर, शिरोळ, मुरगुड आणि कुरुंदवाड नगरपालिकांध्ये नगराध्यक्षपद खेचून आणले आहे, तर भाजपने हुपरी, आजरा आणि चंदगड या ३ ठिकाणी विजय मिळवला आहे.

१. शिरोळ तालुक्यातील जनसुराज्य पक्षाचे आमदार अशोकराव माने यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. माने यांची सून, मुलगा आणि पुतण्या या सर्वांचा पराभव झाला आहे. येथे यादव आघाडीचे नगराध्यक्ष पदासह १५ नगरसेवक विजयी झाले आहेत.

२. मुरगुडमध्ये शिवसेना-भाजपने मोठे यश मिळवत १६ जागांवर विजय मिळवला, तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुहासिनीदेवी पाटील या १ सहस्र ४७८ मते मिळवून विजयी झाल्या.

३. गडहिंग्लजमध्ये २२ पैकी २० ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.

४. कागलमध्ये शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना धक्का देत राष्ट्रवादी-शाहू आघाडीचे २३ नगरसेवक विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता माने या विजयी झाल्या आहेत.

५. पेठवडगाव नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यादव आघाडीच्या विद्याताई पोळ या २ सहस्र २६३ मतांनी निवडून आल्या आहेत. यादव गटाचे १५, तर विरोधी जनसुराज्य-ताराराणी गटाचे ५ नगरसेवक निवडून आले आहेत.

६. जयसिंगपूर येथे नगराध्यक्षपदी संजय पाटील-यड्रावकर हे विजयी झाले असून शिवसेनेचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील शाहू आघाडीने २५ पैकी २० जागांवर विजय मिळवून सत्ता मिळवली आहे.

सांगली जिल्ह्यात ४ ठिकाणी भाजप-सेना युती विजयी !

सांगली जिल्ह्यात ८ नगरपरिषदांमध्ये उरुण-ईश्‍वरपूर आणि आष्टा येथे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विटा आणि शिराळा येथे शिवसेना, जत आणि आटपाडी या दोन जागी भाजप, पलूस नगर परिषद ही काँग्रेसकडे, तर तासगाव येथे माजी खासदार संजयकाका पाटील याच्या स्वाभिमान विकास आघाडीने नगराध्यक्षपदी विजय मिळवला आहे.

१. आटपाडी येथे जिल्हा परिषद शिक्षक पदाचा राजीनामा देऊन भाजपकडून १ सहस्र११७ मतांनी नगराध्यक्ष म्हणून यु.टी. जाधव यांनी आश्‍चर्यकारक विजय मिळवला.

२. ईश्‍वरपूर येथे आमदार जयंत पाटील यांच्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे २२ उमेदवार निवडून आले असून भाजप-मित्रपक्षांना ८ जागा मिळाल्या आहेत.

३. आष्टा नगर परिषदेमध्ये आमदार जयंत पाटील आणि दिवंगत आमदार विलासराव शिंदे यांच्या आष्टा शहर आघाडीने नगराध्यक्ष पदासह २४ पैकी २३ जागांवर एकतर्फी विजय मिळवला आहे. नगराध्यक्षपदी विशाल शिंदे यांचा विजय झाला आहे.

४. बत्तीस शिराळा येथे भाजप, शिवसेना शिंदे महायुतीला ११ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत. महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पृथ्वीसिंग नाईक विजयी झाले आहेत.

सातारा जिल्ह्यात ९ नगरपालिकांपैकी ६ जागी भाजप आणि १ नगरपंचायतीमध्ये भाजपचा विजय

सातारा शहरात भाजपचा ४० जागांवर दणदणीत विजय !

सातारा जिल्ह्यात ९ नगरपालिकांपैकी ६ जागी भाजप आणि एका नगरपंचायतीमध्ये भाजपचा विजय झाला आहे. फलटण नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना धक्का देत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर गटाचे समशेरसिंह नाईक-निंबाळकर विजयी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. फलटण नगर परिषदमध्ये भाजपचे २० नगरसेवक विजयी झाले आहेत. मेढा, रहितमतपूर, म्हसवड, वाई, मलकापूर, सातारा येथे भाजप विजयी झाला आहे.

सातारा शहरात ५० पैकी ४० जागांवर भाजपने मोठा विजय मिळवला असून ९ जागी अपक्ष, तर १ जागा शिवसेनेला मिळाला आहे. नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी झाले आहेत.

कराड नगरपरिषदेत यशवंत विकास आघाडीचे राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्षपदी विजयी !

कराड नगरपरिषदेत यशवंत विकास आघाडीचे राजेंद्रसिंह यादव नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे समर्थक विनायक पावसकर आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थन झाकीर पठाण यांचा पराभव केला. येथील नगर परिषदेत ३१ पैकी भाजपचे १०, अपक्ष १, लोकशाही आघाडीचे १३, यशवंत आघाडीचे ७ नगरसेवक निवडून आले आहेत. येथे आता सत्ता कुणाची येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्ह्यात १२ पैकी ७ जागांवर महायुती, तर अन्य जागांवर स्थानिक आघाडी विजयी !

१. जिल्ह्यातील १२ पैकी अक्कलकोट, मैंदर्गी, अनगर, बार्शी या ४ ठिकाणी भाजप, दुधनी, सांगोला, मोहोळ या ३ ठिकाणी शिवसेना, कुर्डुवाडी येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मंगळवेढा आणि पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडी, करमाळा येथे स्थानिक विकास आघाडी, तर अकलूज येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विजय मिळवला आहे.

२. पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालके या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत.

३. परळीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचा पक्ष विजयी झाला असून भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे.

४. अंबाजोगाईमध्ये राजकिशोर मोदींच्या आघाडीला २० जागा मिळाल्या असून नंदकिशोर मुंदडा यांच्या आघाडीला ११ जागा मिळाल्या आहेत.

पुणे जिल्हा

१. राज्यात सर्वाधिक म्हणजेच १६ हजार ४४४ मतांनी संगमनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. मैथिली तांबे यांचा विजय झालाय, तसेच ३० पैकी २७ नगरसेवक संगमनेर सेवा समितीचे निवडून आलेत.

२. जेजुरी नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १७, भाजपचे २, तर १ अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande