भाजपचे ‘100 पार’चे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज
पुणे, 22 डिसेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड शहराचा 2017 नंतर भाजपच्या माध्यमातून अक्षरशः कायापालट झाला आहे. विकासाची ही गंगा पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या माध्यमातून अविरत वाहत रहावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्ते एक दिलाने, एक विचाराने आणि
भाजपचे ‘100 पार’चे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज


पुणे, 22 डिसेंबर (हिं.स.)।

पिंपरी चिंचवड शहराचा 2017 नंतर भाजपच्या माध्यमातून अक्षरशः कायापालट झाला आहे. विकासाची ही गंगा पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या माध्यमातून अविरत वाहत रहावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कार्यकर्ते एक दिलाने, एक विचाराने आणि संघटनाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेत कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार पिंपळे गुरव येथे करण्यात आला . निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली 100 पारचा संकल्प पूर्ण करू असा निर्धार देखील यावेळी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निवडणूक निर्णय प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपळे गुरव येथील किनारा बँक्वेट हॉलमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. आमदार शंकर भाऊ जगताप प्रतिष्ठानच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी 100पार संकल्पचा पुनरुचार केला.

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande