बीड - माजलगाव येथे बुधवारी १९८ पोलिस पाटील पदांच्या आरक्षणाची सोडत
बीड, 23 डिसेंबर, (हिं.स.) माजलगाव उपविभागातील १९८ पोलीस पाटील पदांसाठी आरक्षण सोडत २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय माजलगाव येथे होणार आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी दिली. जिल्हाधिकारी बीड यांच्या १४ डिसेंबर २०२५
बीड - माजलगाव येथे बुधवारी १९८ पोलिस पाटील पदांच्या आरक्षणाची सोडत


बीड, 23 डिसेंबर, (हिं.स.) माजलगाव उपविभागातील १९८ पोलीस पाटील पदांसाठी आरक्षण सोडत २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय माजलगाव येथे होणार आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी दिली.

जिल्हाधिकारी बीड यांच्या १४ डिसेंबर २०२५ रोजीच्या परिपत्रकानुसार बीड जिल्ह्यातील सर्व उपविभागांतील पोलीस पाटील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार गावनिहाय आरक्षण निश्चितीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून माजलगाव उपविभागासाठी १०० बिंदू सरळसेवा भरतीची बिंदुनामावली प्रमाणित करण्यात आली आहे. माजलगाव तालुक्यातील रिक्त १९८ पदांसाठी गावनिहाय आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. शासन निर्णय क्रमांक बीव्हीपी-११०७/प्र.क् २.५१५/पोल-८, १६ ऑक्टोबर २००८ नुसार लोकसंख्येच्या टक्केवारी नुसार प्रवर्गनिहाय आरक्षण ठरवले जाईल. यामध्ये ३० टक्के महिला आरक्षणाचीही सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीनंतर २४ ते २९ डिसेंबरदरम्यान (शासकीय सुट्टी वगळून) आक्षेप स्वीकारले जातील.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande