
लातूर, 23 डिसेंबर (हिं.स.)। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये लातूर जिल्ह्यात भाजपाला मिळालेल्या भव्य यशाच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी भेट घेऊन सविस्तर अहवाल त्यांच्याकडे सुपुर्द केला. तसेच आगामी लातूर महानगरपालिका निवडणुकीसंबंधी विविध विषयांवर आढावापर माहिती दिली.
निलंगा नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये जनतेच्या आशीर्वादाने भव्य विजय मिळाला. नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री. संजयराज हलगरकर यांच्यासह भाजपाला एक हाती सत्ता देत सर्वसामान्य निलंगेकरांनी पुन्हा एकदा पक्षाला जनसेवेची संधी दिली आहे. जनतेचा हा विश्वास पूर्णपणे सार्थ ठरवत, संपूर्ण देशाला हेवा वाटेल असा निलंगा घडविण्यासाठी निर्धार यावेळी व्यक्त केला
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis