
सोलापूर, 23 डिसेंबर (हिं.स.)राष्ट्रीयकृत बँकाकडून पिक कर्जासाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनानुसार जनसमर्थ पोर्टलदवारे (https://www.jansamarth.in) आता शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली असून २ लाखाच्या मर्यादेपर्यंत पीक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्डदवारे कर्ज मिळवता येणार आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :-
* अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडे शेतकरी आयडी (Farmer ID) असणे बंधनकारक आहे.
•आधारकार्ड
* आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर,
* बैंकपासबुक व पॅनकार्ड (असल्यास) सोबत असावे.
जनसमर्थ पोर्टलच्या सुविधामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणेकरिता आता बँकेत जाण्याची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जाणार नाही व कमीत कमी कालावधीत कर्ज मिळण्यास मदत होईल, या ऑनलाईन प्रकियेकरिता कोणतेही शासकीय शुल्क आकारले जाणार नाही. याकरिता जिल्हा व तालुका प्रशासनाकडून मोहिम राबविण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड