
बीड, 23 डिसेंबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील काही गावात हरभऱ्याच्या पिकावर मोठा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसते आहे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. हरभरा पिक मोठे उत्पन्न देणारे आहे मात्र हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या गावात ही परिस्थिती गंभीर झाली असून शेतकऱ्यांनी यामुळे चिंता व्यक्त केली आहे
गावातील अनेक शेतकऱ्यांच्या हरभरा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे बियाणे खराब होते की, रोगाचा परिणाम झाला असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
पीक हिरवागार अवस्थेत असतानाच झाडे अचानक वाळू लागली. काही झाडांची पाने पिवळी पडून गळून गेली. काड्या सुकल्या. झाडे उपटून पाहिल्यावर मुळे सडलेली व काळवंडलेली दिसली. त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचा अंदाज आला. ही माहिती कृषी सहाय्यक यांना देण्यात आली. त्यांनी शेतात पाहणी केली. त्यांनी सांगितले की, फवारणी केली होती. तरीही आठवडा उलटूनही काही फरक पडलेला नाही. एक एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्रातील हरभरा पीक पूर्ण नष्ट झाले आहे. काही ठिकाणी नुकसान इतके मोठे आहे की, शेतकऱ्यांना पीक काढून टाकून पुन्हा नांगरणी करावी लागली आहे. बियाणे, खत, औषधे आणि मजुरीवर केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis