
नवी दिल्ली : घनदाट धुके आणि कमी दृश्यतेमुळे मंगळवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10 उड्डाणे रद्द करण्यात आली, तर 270 हून अधिक उड्डाणांना विलंब झाला. दिवसभरात 6 आगमन आणि 4 प्रस्थान उड्डाणे रद्द झाली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्थान उड्डाणांना सरासरी 29 मिनिटांचा विलंब नोंदवण्यात आला. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइटरडार24 च्या माहितीनुसार, एकूण 270 पेक्षा जास्त उड्डाणे उशिराने रवाना झाली.दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (डायल) या विमानतळ संचालक संस्थेने ट्विटरवर (एक्स) दिलेल्या माहितीत सांगितले की, “विमानतळावरील दृश्यतेत हळूहळू सुधारणा होत आहे. मात्र, काही गंतव्यांसाठी उड्डाणांच्या प्रस्थानात विलंब होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज सुमारे 1,300 उड्डाणांची ये-जा होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी