बीडला मुलभूत सुविधा आणि सुरक्षा आम्ही देऊ - आ. विजयसिंह पंडित
बीड, 23 डिसेंबर (हिं.स.)। बीड नगर परिषद निवडणुकीतील नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता ताई पारवे यांच्यासह २१ नगरसेवकांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी ओबीसी सेलचे प
मुलभूत सुविधा आणि सुरक्षा आम्ही देऊ. असे आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितले.


बीड, 23 डिसेंबर (हिं.स.)। बीड नगर परिषद निवडणुकीतील नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता ताई पारवे यांच्यासह २१ नगरसेवकांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप, सचिन मुळूक, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष सुहास पाटील, यांच्यासह नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलता ताई पारवे, यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बीड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या महायुतीला बीडकरांनी आश्वासक आणि अपेक्षित प्रतिसाद दिला आहे. हा विजय पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कारभार आणि राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे. बीडकरांनी विकासाच्या भुमिकेवर विश्वास ठेऊन युतीला दिलेला हा जनाधार आहे. भैय्यासाहेबांच्या मार्गदर्शनात येणाऱ्या काळात काम करणार असून सामान्य लोकांच्या मतांचा आदर करत मुलभूत सुविधा आणि सुरक्षा आम्ही देऊ. असे आमदार विजयसिंह पंडित यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande