
— पाठीमागे चर्चा करण्याचे अटलजी समर्थक नव्हते : चंद्रप्रकाश अग्निहोत्री
लखनऊ, २४ डिसेंबर (हि.स.)। उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील उर्मिला पार्कमध्ये एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला अटलजी संबोधित करत होते. अचानक माईकमध्ये आकाशवाणी (ऑल इंडिया रेडिओ)चे सिग्नल येऊ लागले. समोर उपस्थित लोकांमधून आवाज सुधारण्याची मागणी होऊ लागली.
तेव्हा अटलजींनी सभेला शांत करत विचारले, “माझा आवाज तुम्हाला स्पष्ट ऐकू येतोय का?”
लोकांकडून उत्तर आले, “हो, हो.”त्यावर अटलजी हसत म्हणाले, “मग एका कानाने ऑल इंडिया रेडिओ ऐका आणि दुसऱ्या कानाने माझे भाषण ऐका.”इतके म्हणताच सभेतील गर्दी शांत झाली आणि त्याच क्षणी आकाशवाणीचे सिग्नल येणेही बंद झाले. हा किस्सा अटलजींचे जिवलग मित्र आणि भारतीय नागरिक परिषदचे अध्यक्ष चंद्रप्रकाश अग्निहोत्री यांनी हिंदुस्थान समाचारशी शेअर केला.
अग्निहोत्री यांनी सांगितले की, जेव्हा स्वर्गीय रामप्रकाश गुप्त भारतीय जनसंघाचे प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा अटलजी लखनऊला आले होते. ते मागील व्हरांड्यात बसले होते. आम्ही माजी आमदार भगवती शुक्ल यांच्यासोबत अटलजींना भेटण्यासाठी तिथे पोहोचलो. अचानक भगवती शुक्ल यांनी उत्तर प्रदेश जनसंघाबाबत चर्चा सुरू केली.त्यावर अटलजी म्हणाले, “भगवती, थांबा.” आणि रामप्रकाश यांना म्हणाले, “इथे या.”रामप्रकाश आले व खुर्चीवर बसले. तेव्हा अटलजी म्हणाले, “भगवती, तुम्ही काय करत आहात? गप्प बसा.”संघटनेविषयीची चर्चा समोरासमोरच व्हावी, असे त्यांना वाटत असे. पाठीमागे चर्चा करण्याचे ते समर्थक नव्हते.
अटलजी जेव्हा पक्षकार्यकर्त्यांना भेटत किंवा एखाद्या खास प्रसंगी स्वतः कुणाच्या घरी जात, तेव्हा ते त्या कुटुंबातीलच एक सदस्य असल्यासारखे वाटत.
चंद्रप्रकाश अग्निहोत्री हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक असून ते लखनऊतील डालीगंज येथे राहतात. अटलजींसोबतच्या आपल्या आठवणी सांगताना ते भावुक होतात.‘सुंदर साउंड सर्व्हिस’ नावाचे चंद्रप्रकाश अग्निहोत्री यांचे दुकान होते. लखनऊमधील मोठ्या कार्यक्रमांमध्ये बहुतांश वेळा त्यांचीच साउंड सर्व्हिस वापरली जात असे
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी