रायगड : राहुल सोनवले यांची दक्षता समिती सदस्यपदी निवड
रायगड, 24 डिसेंबर (हिं.स.)। गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळख असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख राहुल सोनवले यांची उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती (SC/ST अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) सदस्यपदी झाल्याबद्दल त्या
राहुलभाई सोनवले यांचा भव्य नागरी सत्कार


रायगड, 24 डिसेंबर (हिं.स.)। गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळख असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख राहुल सोनवले यांची उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती (SC/ST अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) सदस्यपदी झाल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार व अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सुधागडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

या प्रसंगी राहुल सोनवले यांच्या सामाजिक बांधिलकीचे, पक्षनिष्ठेचे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेल्या संघर्षाचे मान्यवर वक्त्यांनी भरभरून कौतुक केले. समाजातील उपेक्षित, वंचित घटकांच्या न्यायहक्कासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळे रायगड जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून आले.

सत्काराला उत्तर देताना राहुल सोनवले म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घराघरांत पोहोचवणे, पक्ष संघटना मजबूत करणे आणि सभासद नोंदणी वाढवणे हेच माझे प्रमुख ध्येय आहे. मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून समाजासाठी अधिक जोमाने काम करणार आहे.” या सोहळ्यानिमित्त सामाजिक व राजकीय प्रबोधनपर भाषणे झाली. रात्री उशिरापर्यंत ‘भीम गीतांच्या’ बहारदार कार्यक्रमाने वातावरण भारावून टाकले.

फटाक्यांच्या आतषबाजीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थितांसाठी उत्कृष्ट भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. राहुल सोनवले यांच्या निवडीमुळे सुधागड तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande