नाशिक : भाजप स्वतंत्र लढण्याचे संकेत
शिवसेना शिंदे पक्ष आणि राकपा युती करण्याची तयारी नाशिक, 25 डिसेंबर (हिं.स.)। - नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी म्हणून महायुतीमध्ये सुरू असलेली बोलणी यशस्वी होत नसल्याचे समोर येत असताना आता दुसरीकडे मात्र निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्यावतीन
नाशिक : भाजप स्वतंत्र लढण्याचे संकेत


शिवसेना शिंदे पक्ष आणि राकपा युती करण्याची तयारी

नाशिक, 25 डिसेंबर (हिं.स.)। - नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी म्हणून महायुतीमध्ये सुरू असलेली बोलणी यशस्वी होत नसल्याचे समोर येत असताना आता दुसरीकडे मात्र निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाबरोबर युती करून निवडणुकीसाठी युती करण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत .

नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती करण्यात यावी अशी आग्रही मागणी राज्याचे कुंभमेळा मंत्री आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे करत होते यासाठी ते सातत्याने शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर चर्चा करत होते दोन्हीही पक्षाच्या वतीने 50 आणि 30 जागांची मागणी अनुक्रमे करण्यात आलेली होती ही मागणी केली जात असतानाच नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यामध्ये नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाला मोठे यश मिळाले त्यामुळे शिंदे गटाच्या अशा या महानगरपालिका निवडणुकीसाठी अजूनच पल्लवीत झाल्या.

सर्व घटना घडत असताना युतीबाबत चर्चा सुरू असताना या युतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बाहेर ठेवले गेले त्यानंतर सातत्याने यावर निर्णय हा स्थानिक स्तरावरती शहराध्यक्ष व इतर पदाधिकारी चर्चा करून निश्चित करतील आणि मग घोषणा केली जाईल असे सांगण्यात येत होते परंतु अचानक पणे गुरुवारी भाजपा कडून महायुती होत नसल्याचे संकेत मिळाल्यानंतर शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाबरोबर महायुती करावी म्हणून चर्चा सुरू करण्यात आलेली आहे या चर्चेच्या अजून काही फेऱ्या होऊन अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी दुसरीकडे मात्र आता महायुती एकसंघ नसल्याचे स्पष्ट होत आलेले आहे याबाबतची घोषणा यदा कदाचित शुक्रवारी रात्री किंवा शनिवारी सकाळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande