चांदुर रेल्वेत बंडखोर उमेदवारांचा मोठा विजय, तिकिट काँग्रेसने कापलं, पण जनतेने शिक्का मारला
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.) नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने तिकिट नाकारलेल्या उमेदवारांनी थेट जनतेच्या दरबारात धाव घेत काँग्रेस नेतृत्वालाच जोरदार धक्का दिला आहे. पक्षातील सक्रीय कार्यकर्ते हर्षल वाघ, सुमेध सरदार आणि सतपाल वरठे यांच्या पत्नी
चांदुर रेल्वेत बंडखोर उमेदवारांचा मोठा विजय तिकिट काँग्रेसने कापलं, पण जनतेने शिक्का मारला


चांदुर रेल्वेत बंडखोर उमेदवारांचा मोठा विजय तिकिट काँग्रेसने कापलं, पण जनतेने शिक्का मारला


चांदुर रेल्वेत बंडखोर उमेदवारांचा मोठा विजय तिकिट काँग्रेसने कापलं, पण जनतेने शिक्का मारला


अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)

नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने तिकिट नाकारलेल्या उमेदवारांनी थेट जनतेच्या दरबारात धाव घेत काँग्रेस नेतृत्वालाच जोरदार धक्का दिला आहे. पक्षातील सक्रीय कार्यकर्ते हर्षल वाघ, सुमेध सरदार आणि सतपाल वरठे यांच्या पत्नी प्रियंका वरठे यांना काँग्रेसकडून नगरसेवक पदाचे तिकिट नाकारण्यात आले होते. मात्र या निर्णयाला जनतेने साफ नकार देत तिघांनाही विजयी केले. तिकिट नाकारल्यानंतर हर्षल वाघ यांनी बंडखोरीची भूमिका घेत 'आपलं चांदूर 'पॅनलला समर्थन देत अपक्ष उमेदवारी दाखल केली तर सुमेध सरदार यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवली व विजयी झाले. याचबरोबर प्रियंका सतपाल वरठे यांनीही अपक्ष म्हणून मैदानात उतरून तब्बल 462 मतांनी रेकॉर्ड विजय मिळवला. विशेष म्हणजे, तिन्ही उमेदवारांनी कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हाविना निवडणूक लढवूनही मतदारांचा विश्वास संपादन केला, हे काँग्रेससाठी आत्मपरीक्षणास भाग पाडणारे ठरले आहे. या निकालावरून स्पष्ट होते की, तिकिटापेक्षा जनसंपर्क, काम आणि विश्वासाला मतदारांनी अधिक महत्त्व दिले. काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाच्या निर्णयक्षमतेवर आता प्रश्न उपस्थित होत असून, या पराभवातून पक्ष काय घडा घेतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सिमा महेश कलावटे यांनी स्वतःहून निवडणुकीच्या रिगणात उतरले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande