लातूरात दयानंद कला महाविद्यालयात शिक्षक, अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विभागस्तर स्पर्धा संपन्न
लातूर, 25 डिसेंबर (हिं.स.)। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड ता. जि. लातूर द्वारा शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासुन विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात ये
लातूरात दयानंद कला महाविद्यालयात शिक्षक, अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विभागस्तर स्पर्धा संपन्न


लातूर, 25 डिसेंबर (हिं.स.)।

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुरुड ता. जि. लातूर द्वारा शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासुन विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येत आहे. २०२५-२६ विभागस्तर स्पर्धा दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे

संपन्न झाल्या.

या स्पर्धेत राज्य मंडळाच्या अधिनस्त सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित, अंशत: अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी लातूर नांदेड व धाराशिव येथे तालुकास्तरीय स्पर्धा होऊन त्यातून गुणानुक्रमे आलेल्या स्पर्धकांची विभागीय स्पर्धा घेण्यात आली. यात सर्व तालुक्यातून २०० स्पर्धक सहभागी झाले होते.

विभागीय स्पर्धेत जवळपास १३ कलाप्रकार यात वैयक्तिक नृत्य, नाटक, योग, रांगोळी, स्वरचित काव्य, वक्तृत्व, वादविवाद, पीपीटी, एक्सेल, वर्ल्ड अ‍ॅनिमेशन, कथाकथन, स्वरचित काव्य, सुगम गायन व संगीत वाद्य वादन या स्पर्धांचे आयोजन डायटचे प्राचार्य डॉ. मारुती सलगर यांच्या मार्गदर्शनाखालीप्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या सहकार्याने स्पर्धा समन्वयक अधिव्याख्याता प्रा.अनिल जाधव व उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे यांनी केले. या स्पर्धेसाठी तीनही जिल्ह्यातून तज्ञ परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षकांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या सर्व स्पर्धेतून स्पर्धकांची निवड केली. डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विजयकुमार सायगुंडे, डॉ. जगन्नाथ कापसे, डॉ. अंजली सूर्यवंशी, अधिव्याख्याता घनश्याम पोळे, निलोफर पटेल, सुचित्रा जाधव, गिरीश माने, विषय तज्ञ व विषय शिक्षक यांचे सहकार्य लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande