
बीड, 25 डिसेंबर (हिं.स.)।कृषीकुल प्रशिक्षण केंद्रात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करता येईल, यावर विषयावर सिरसाळा येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेला चेअरमन अशोक गुलाटी आणि ग्लोबल विकास ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मयांक गांधी उपस्थित होते.
गांधी यांनी सांगितले, की, केवळ उत्पादन वाढून चालणार नाही. खर्च कमी करणे, बाजारपेठ सुधारणा सुधारणा आणि धोरणात्मक बदल गरजेचे आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, मृदा परीक्षण, अचूक खत व पाणी व्यवस्थापन यामुळे उत्पादन खर्च कमी होतो. यांत्रिकीकरण आणि सामूहिक शेतीचा अवलंबही फायदेशीर ठरतो.पारंपरिक पिकांबरोबर भाजीपाला, फळबागा, कडधान्ये, औषधी वनस्पती यांचे उत्पादन वाढवावे. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळावे. थेट ग्राहक विक्री, शेतकरी उत्पादक कंपन्या, ई-नाम आणि प्रक्रिया उद्योगाशी थेट जोडणी यामुळे चांगला दर मिळतो.असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis