नाशिक : मनपा निवडणुकीसाठी 10 ठिकाणी होणार मतमोजणी
नाशिक, 25 डिसेंबर (हिं.स.)।नाशिक महापालिका निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. महापालिका प्रशासनाने ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा दहा केंद्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. निवडणूक आयोगा
मनपा निवडणुकीची दहा ठिकाणी होणार मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी


नाशिक, 25 डिसेंबर (हिं.स.)।नाशिक महापालिका निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. महापालिका प्रशासनाने ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे अशा दहा केंद्रांची यादी प्रसिद्ध केली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मनपा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची यादी जाहीर केली गेली आहे. त्यानुसार, शहरात १५६८ मतदान केंद्रे असतील. प्रत्येक केंद्रावर ७०० ते ८०० मतदार मतदान करतील.मतदान केंद्रांवर वीज पुरवठा, पुरेसा उजेड, खेळती हवा, पंखे, पिण्याचे पाणी, स्त्री-पुरुषांसाठी शौचालय, तसेच टेबल, खुर्च्या, बेंच, पंखे, रांगेत उभ्या राहण्यासाठी छायादार शेड्स यासारख्या सोयी सुविधा पुरवल्या जातील.

वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी रॅम्पची सोय करण्यात येईल. अपंग मतदारांसाठी तळमजल्यावर केंद्र ठेवले जाणार आहे. मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून आदर्श मतदान केंद्रांची निर्मिती केली जाईल. स्थानिक संस्कृती आणि गरजेनुसार मतदान केंद्रांत अतिरिक्त आकर्षण व वैशिष्ट्ये जोडली जाऊ शकतात.

पर्यावरणपूरक, पुनर्वापरयोग्य आणि बायोडिग्रेडेबल साहित्य वापरून मतदान केंद्रे उभारली जातील व प्लास्टिकमुक्त ठेवण्याचे निर्देश आहेत. महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या केंद्रांवर महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिघात कोणत्याही पक्षाचे कार्यालय राहणार नाही, आणि त्याच्या बाहेर प्रत्येक उमेदवाराला फक्त एक मतदान सहाय्य केंद्र उभारण्याची परवानगी असेल. केंद्रावर १ टेबल, २ खुर्च्या, सावलीसाठी छत्री, ताडपत्री किंवा कापड टाकण्याची परवानगी असेल.

प्रभागनिहाय मतमोजणीचे ठिकाण

प्रभाग मतमोजणीचे ठिकाण

१ ते ६ मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी

७१२,२४दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका

१३,१४,१५ वंदे मातरम सभागृह, डिजीपीनगर

१६,२३,३० दिव्यांग भवन, मुंबई नाका

17, 18, 19 शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव रोड

20, 21, 22 नाशिकरोड विभागीय कार्यालय, दुर्गा गार्डन

25, 26, 28 प्रबोधनकार ठाकरे सभागृह, अंबड पोलिस ठाण्यामागे

27, 29, 31 राजे संभाजी स्टेडियम, नवीन नाशिक

8, 9, 11 सातपूर क्लब हाऊस, सातपूर

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande