
नवी दिल्ली, २५ डिसेंबर (हिं.स.) । राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी (२६ डिसेंबर) विज्ञान भवन येथे आयोजित एका विशेष समारंभात पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्रदान करतील. २०२५ या वर्षात १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील वीस मुलांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. वीर बाल दिवस २०२५ चा राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम येथील भारत मंडपम येथे आयोजित केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात उपस्थित राहतील. ते मुले आणि युवकांना संबोधित करतील आणि राष्ट्र उभारणीत तरुण नागरिकांच्या भूमिकेवर प्रकाश टाकतील.
भारत सरकारचे महिला आणि बाल विकास मंत्रालय शुक्रवारी (२६ डिसेंबर) राष्ट्रीय स्तरावर वीर बाल दिवस साजरा करणार आहे. या प्रसंगी भारताच्या तरुण वीरांचे धाडस, त्याग आणि अनुकरणीय मूल्यांचे स्मरण केले जाईल. या दिवशी, विविध क्षेत्रात अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (PMRBP) प्रदान केला जाईल.पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार हा केंद्र सरकारकडून दरवर्षी मुलांना दिला जाणारा एक प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मान आहे. हा पुरस्कार शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि क्रीडा या क्षेत्रातील अपवादात्मक उत्कृष्टतेला मान्यता देतो.भारत मंडपम येथे होणाऱ्या कार्यक्रमात देशभरातील शालेय मुले, पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्तकर्ते आणि इतर मान्यवर सहभागी होतील. भारताचा समृद्ध सभ्यता वारसा आणि शौर्याची भावना दर्शविणारे सांस्कृतिक कार्यक्रम या उत्सवाचा प्रमुख भाग असतील. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांचे स्वागत भाषण होईल.---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे