ओडिशा : चकमकीत गणेश उईकेसह 6 नक्षलवादी ठार
कंधमाल, 25 डिसेंबर (हिं.स.) ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सीपीआय (माओवादी)च्या वरिष्ठ नेते गणेश उइकेसह 6 नक्षली ठार झाले आहेत. ही झुंज चकापाड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या घनदाट जंगलात झाली. गणेश उईकेवर 1.1 कोटी रु
दुर्दांत नक्षलवादी गणेश उईके


कंधमाल, 25 डिसेंबर (हिं.स.) ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सीपीआय (माओवादी)च्या वरिष्ठ नेते गणेश उइकेसह 6 नक्षली ठार झाले आहेत. ही झुंज चकापाड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या घनदाट जंगलात झाली. गणेश उईकेवर 1.1 कोटी रुपयांचे बक्षीस होते. तसेच तो अनेक वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांच्या टार्गेटवर होता.

राज्यातील नक्षलविरोधी मोहिमांचे नेतृत्व करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, चकापाड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या घनदाट जंगलात बुधवारी रात्री पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत सीपीआय (माओवादी) केंद्रीय समितीचा सदस्य गणेश उईके (वय 69) यांच्यासह 6 नक्षलवादी ठार झालेत. मृतकांमध्ये महिला नक्षलवाद्यांचा देखील समावेश आहे. गणेश उईके तेलंगणाच्या नलगोंडा जिल्ह्याचा रहिवासी असून तो पक्का हनुमंतु, राजेश तिवारी अशा टोपण नावांनी देखील ओळखला जायचा. त्याच्यावर प्रशासनाने 1.1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलीसांनी सांगितले की या यशस्वी ऑपरेशनमध्ये गणेश उइकेसह आणखी 5 नक्षलवादी ठार झाले आहेत, ज्यात दोन महिला देखील आहेत. सध्या इतर नक्षलींची ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलांसाठी हे एक मोठे यश मानले जात आहे कारण उइके अनेक वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात होता आणि परिसरातील नक्षली हालचालींमध्ये सहभागी होता. सध्या परिसरात शोधमोहीम अजूनही सुरू आहे.

सुरक्षा दलांच्या यशाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीटरवर (एक्स) पोस्ट लिहीली आहे. आपल्या संदेशात गृहमंत्री म्हणाले की, नक्षलमुक्त भारताच्या दिशेने महत्त्वपूर्ण यश. ओडिशा कंधमालमध्ये चालवलेल्या मोठ्या मोहिमेत केंद्रीय समितीचे सदस्य गणेश उइकेसह सहा नक्षली ठार झाले. या मोठ्या यशासह ओडिशा नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. आम्ही 31 मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद संपविण्यास ठामपणे कटिबद्ध आहोत.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande