पंतप्रधान मोदींनी लखनऊमध्ये 'राष्ट्र प्रेरणा स्थळ'चे केले उद्घाटन
लखनऊ, 25 डिसेंबर (हिं.स.)।आज भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 101 वी जयंती आहे. या निमित्ताने दिल्लीतील सदैव अटल येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनऊ येथे राष्ट्र प्रेरणा स्थल या भव्य
पंतप्रधान मोदींनी लखनऊमध्ये 'राष्ट्र प्रेरणा स्थळ'चे केले उद्घाटन


लखनऊ, 25 डिसेंबर (हिं.स.)।आज भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची 101 वी जयंती आहे. या निमित्ताने दिल्लीतील सदैव अटल येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनऊ येथे राष्ट्र प्रेरणा स्थल या भव्य स्मारकाचे उद्घाटन केले. राष्ट्र प्रेरणा स्थल सुमारे 65 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात सुमारे 230 कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित करण्यात आले आहे.

हा परिसर एक राष्ट्रीय संपत्ती म्हणून पाहिला जात असून, भविष्यातील पिढ्यांना नेतृत्व, सेवा आणि सांस्कृतिक जाणीव यांची प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या भव्य उद्घाटन समारंभाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणासह कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हा कार्यक्रम पार पडला आणि लखनऊ शहराने एका नव्या युगाची सुरुवात अनुभवली. पंतप्रधान मोदी यांनी दुपारी 2.30 वाजता या विशाल स्मारकाचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. त्यांनी लिहिले, “देशाच्या महान विभूतींच्या वारशाचा सन्मान आणि संवर्धन करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. याच क्रमाने उद्या दुपारी सुमारे 2.30 वाजता लखनऊ येथे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्र प्रेरणा स्थल’चे उद्घाटन करण्याचे सौभाग्य मला मिळणार आहे.”

पुढे त्यांनी लिहिले,“या ठिकाणी वाजपेयीजींसोबतच डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या भव्य कांस्य प्रतिमाही उभारण्यात आल्या आहेत. यासोबतच एक अत्याधुनिक संग्रहालय विकसित करण्यात आले आहे, जिथे राष्ट्रनिर्माणात या दूरदर्शी नेत्यांचे अमूल्य योगदान जाणून घेण्याची संधी मिळेल.”

राष्ट्र प्रेरणा स्थलची वैशिष्ट्ये : 65 एकरांच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेला हा परिसर 230 कोटी रुपयांच्या खर्चातून विकसित करण्यात आला आहे. या परिसरात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 65 फूट उंच कांस्य प्रतिमा उभारण्यात आल्या आहेत. या प्रतिमा भारताच्या राजकीय विचारधारेत, राष्ट्रनिर्मितीत आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे प्रतीक आहेत.येथे कमळाच्या आकारात उभारलेले एक अत्याधुनिक संग्रहालय आहे, जे सुमारे 98,000 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande