धर्म म्हणजे प्रेम अर्पण, ही साने गुरुजींची व्याख्या श्रेष्ठ : इतिहास तज्ञ साळुंके
बीड, 25 डिसेंबर (हिं.स.)। साने गुरुजींनी सांगितलेली धर्माची व्याख्या ही सर्वश्रेष्ठ आहे. तिचे आचरण केल्यास देशात सहिष्णुतेचे चैतन्य निर्माण होऊ शकते. राष्ट्र एकसंघ होऊ शकते. अशी भावना इतिहास तज्ज्ञ सतीश साळुंके यांनी व्यक्त केली. साने गुरुजींच्या
धर्म म्हणजे प्रेम अर्पण, ही साने गुरुजींची व्याख्या श्रेष्ठ : इतिहास तज्ञ साळुंके


बीड, 25 डिसेंबर (हिं.स.)। साने गुरुजींनी सांगितलेली धर्माची व्याख्या ही सर्वश्रेष्ठ आहे. तिचे आचरण केल्यास देशात सहिष्णुतेचे चैतन्य निर्माण होऊ शकते. राष्ट्र एकसंघ होऊ शकते. अशी भावना इतिहास तज्ज्ञ सतीश साळुंके यांनी व्यक्त केली.

साने गुरुजींच्या जयंतीनिमित्त परिवर्तन प्रतिष्ठानने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी डॉ. साळुंके बोलत होते. ते म्हणाले, ''खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे याहून श्रेष्ठ धर्माची व्याख्या असू शकत नाही. प्रत्येक चराचरात चैतन्य आहे. त्यावर प्रेम केल्यास सहिष्णुता निर्माण होते. साने गुरुजींना याच आशावादावर विश्वास होता. मातृत्व ही संकल्पना केवळ स्त्रियांपुरती मर्यादित नाही. ती हृदयाशी निगडित भावनिक भावना आहे. साने गुरुजींच्या जीवनातून ही भावना स्पष्ट होते. त्यांचे हृदय हे मातृत्वाचे हृदय होते. त्यांनी लिहिलेले 'श्यामची आई' हे पुस्तक जागतिक स्तरावर मौल्यवान मानले जाते. भावना, संवेदना आणि प्रेम व्यक्त करणारे हे सर्वोच्च साहित्य आहे, असे डॉ. साळुंके यांनी सांगितले. कार्यक्रमाला परिवर्तन प्रतिष्ठानचे सर्व कलावंत आणि सदस्य उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande