
नाशिक, 25 डिसेंबर (हिं.स.)। - आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राजकीय फोडाफाडीला सुरुवात केली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून गुरुवारी भाजपकडून नाशिक महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे दोन बडे मोहरे गळाला लावले. ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे यांचा आज पक्षप्रवेश होण्याच्या आधी . मात्र, या पक्षप्रवेशाला भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि भाजपच्या निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांनी कडाडून विरोध केला आहे. तरीही विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे हे नेते पक्षप्रवेशासाठी भाजपच्या कार्यालयात पोहोचले आणि संकट मोचक असणारे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची खेळी यशस्वी झाली त्यांनी हा प्रवेश करूनच घेतला .
नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला त्यासाठी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील फरांदे व भाजपचे कार्यकर्ते हे पक्षाच्या कार्यालयात पोहोचले त्यांनी या ठिकाणी शहराध्यक्ष सुनील केदार यांना भेटले त्यांना घेराव घातला त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हे प्रवेश होऊ नये यासाठी सांगितले वेगवेगळ्या प्रश्नांचा भडीमार केला परंतु सुनील केदार यांनी याबाबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनच निर्णय घेतील असे सांगून समजून घालण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्ते ऐकेना . या दोघांना पक्षात घेण्यासासंबंधी माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही असं देवयानी फरांदे यांनी म्हटलं आहे. नाशिक भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्ष प्रवेशाला विरोध आहे. विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्या पक्ष प्रवेशावरुन नाशिक भाजप कार्यालयाबाहेर वादाची स्थिती निर्माण झाली . नाशिक भाजप कार्यालयाबाहेर एक हाय वोलेटेज ड्रामा पहायला मिळत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा पक्ष प्रवेश होऊ देणार नाही अशी भूमिका देवयानी फरांदे यांनी घेतली आहे. त्यामुळे पक्ष प्रवेशाच्यावेळी दोन्ही गट आमने-सामने येण्याची भिती आहे. विनायक पांडे आणि यतीन वाघ यांना भाजपत घेतल्यास स्थानिक कार्यकर्त्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्ष प्रवेशाला विरोध होत आहे. काहीही झालं, तरी हा पक्ष प्रवेश होऊ देणार नाही. आम्ही सगळी तयारी करायला लावली. ते दरवाजा ठोठावत आहेत. पण भाजपचा दरवाजा निष्ठावंतांसाठी उघडणार. गिरीश महाजन, देवयानी फरांदे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे त्यांचा स्वार्थ साध्य करण्यासाठी आलेत अशी टीका स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. दरम्यान संजय राऊत यांनी ट्विट करुन विनायक पांडे आणि यतीन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. पण काल संध्याकाळीच दोन्ही नेत्यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. या सर्व प्रश्नांवर अखेर कुंभमेळा मंत्री आणि भाजपाचे संकट मोचक गिरीश महाजन हे कार्यालयात पोहोचले त्यांनाही कार्यकर्त्यांनी त्याचे प्रश्न विचारले पण त्यांनी पक्ष मोठा करायचा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी, व मंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करायचे आहे हे लक्षात ठेवा पक्ष मोठा करायचा आहे त्यामुळे कोणाचं काहीही ऐकलं जाणार नाही अशी रोखठोक भूमिका घेऊन निवड समिती प्रमुख आमदार देवयानी फरांद व कार्यकर्त्यांच्या विरोधाला मोडून काढले .
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV