
छत्रपती संभाजीनगर, 25 डिसेंबर (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे तापडिया कासलीवाल मैदान येथे भव्य उद्घाटन संपन्न झाले.भाजपाचे नेते तथा मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला
यावेळी श्री गणरायाची विधिवत आरती व पूजन करून प्रचार कार्याची सुरुवात करण्यात आली..
याप्रसंगी भारताचे माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
संभाजीनगर येथे भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या वेळी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती च्या निमित्ताने आदरांजली वाहून कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रचार कार्यालयाच्या शुभारंभास मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी महानगरपालिका निवडणुक एकमताने लढू असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis